Home मराठवाडा मळी घेऊन जाणारा हायवा पेटला

मळी घेऊन जाणारा हायवा पेटला

113

घनसावंगी — प्रतिनिधी

जालना – तिर्थपुरी-भोजगाव या रस्त्यावर शेवगा फाट्यावर शेवगा शिवारातील गट नं. १८३ मधील रस्त्यावर अचानक हायवाने पेट घेतल्याने हायवाची समोरील संपूर्ण केबिन ,मशीन , चेसीस ,हाऊजीगं , जळून खाक झाली असून गाडीचे केबिन , चेसीस ,मशीन,हाऊजीगं ,टायर ,जळीत लोखंडी पार्ट सर्व निकामी झालेले दिसत आहेत .सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.
याबाबत माहिती अशी की,अंबड तालुक्यातील पाथरवाला खुर्द येथील प्रणित हर्षे यांच्या मालकीचा हायवा क्रमांक एम.एच.२१-बी.जी.-२२२७ हा तिर्थपुरी-भोजगाव या रस्त्यावर शेतकर्यासाठी मळी घेऊन जात होता.परंतु दुपारी २ च्या दरम्यान हायवाच्या समोरील कॅबिनने अचानक पेट घेतला.हा पेट इतका भयानक होता की,हायवाचा फक्त लोखंडी पत्रा शिल्लक राहिला आहे. जवळपास हायवाचे ९० ते ९५ टक्के नुकसान झाले आहे.
ज्यामध्ये हायवाचे अंदाजे नुकसान हे ३२ ते ३५ लाख रुपयांचे झाले आहे. यात हायवाची राख रांगोळी झाल्याचे दिसून येत आहे.यात समोरील काचा, टायर,इंजिन व इतर भाग शिल्लक राहिले नाही.यात हायवाने घेतलेला पेट इतका भयानक होता की,रस्त्याच्या कडेला असेलेले लिंबाचे झाडही होरपळून गेले आहे. यात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.या हायवा जळीत प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल एस.एस.खडेकर यांनी आकस्मिक जळीत क्रमांक ०४/२०२० प्रमाणे घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.