Home विदर्भ राहुल गांधी विचारमंचच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी ज्येष्ठ नगरसेवक जावेद अंन्सारी यांची नियुक्ती

राहुल गांधी विचारमंचच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी ज्येष्ठ नगरसेवक जावेद अंन्सारी यांची नियुक्ती

260
0

यवतमाळ , दिनांक ८ :- यवतमाळ शहराचे ज्येष्ठ नगरसेवक व जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष जावेद परवेज अन्सारी यांची राहुल गांधी विचारमंचच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

6 मार्च रोजी जावेद परवेज अब्दुल समद अन्सारी यांना राहुल गांधी विचार मंच कोअर कमिटीने घेतलेल्या निर्णयानंतर मुख्यालय दिल्ली येथून राष्ट्रीय प्रभारी सुमित यदुवंशी यांच्या स्वाक्षरीने नियुक्ती पत्र पाठविण्यात आले.उल्लेखनीय म्हणजे जिल्ह्यात सामाजीक,राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले जावेद अन्सारी सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रश्न,समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहतात.त्यांची राहुल गांधी विचारमंच जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने जिल्हा काँग्रेस कमिटी नेते , पदाधिकारी , कार्यकर्त्यामध्ये उत्साह संचारले असून शहरात व जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्ते व त्यांच्या मोठा चाहता वर्ग असलेल्या जावेद अन्सारी मित्र परिवारात या नियुक्तीचे स्वागत करण्यात येत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.जावेद अन्सारी यांनी या महत्वपूर्ण पदावर आपल्या नियुक्तीचे श्रेय राज्याचे वरिष्ठ काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे,माजी खासदार विजय दर्डा,आमदार व जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष डॉ वजाहत मिर्झा,माजी मंत्री शिवाजीराव मोघे,वसंतराव पुरके,माजी आमदार वामनराव कासावर, विजय खडसे,जि.प.चे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब माँगुळकर,माजी अध्यक्ष राहुल ठाकरे,प्रवीण देशमुख,यवतमाळ कृउबास.सभापती रवी ढोक व जिल्हा काँग्रेस कमिटीतील सहकारी नेते,पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले आहे.

नवनियुक्त जिल्हाध्यक्ष जावेद अन्सारी यांची प्रतिक्रिया – राहुल गांधी विचार मंचच्या जिल्हाध्यक्ष सारखा महत्वपूर्ण पदावर नियुक्त करून माझ्यावर जो जबाबदारी सोपविण्यात आली आहे,यासाठी मी काँग्रेसच्या राष्ट्रीय व राज्यातील नेत्यांचा आभारी आहो,या मंचच्या माध्यमातुन जिल्हाध्यक्ष या नात्याने व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने काँग्रेसची विचारधारा जिल्हाभरात सर्वसामान्या नागरिकांपर्यंत , घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेईल. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळेल या करिता राहुल गांधी विचार मंच,जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी,नेते व कार्यकर्ते सदैव सक्रिय राहून कार्य करतील.असा मी या माध्यमाने वचन देतो.