Home मराठवाडा जालना जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीला परवानगी द्यावी ,

जालना जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीला परवानगी द्यावी ,

55
0

जालना जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीला परवानगी द्यावी ,

विक्रेत्यांवर उपासमारीची पाळी ,

खाणारे फिरताहेत दारोदारी ,

नजाकत सय्यद ,

जालना: जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थाची लॉकडाउनडाऊनच्या काळात विक्री करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने द्यावी आज पान तंबाखू बंद असल्या मुळे या वायसायाशी संबंधित विक्रेत्यावर उपासमारी ची पाळी आली आहे तर जे खाणारे आहेत ते दारोदारी भटकंती करीत आहे केंद्र सरकार ने दारू सह पान मसाला तंबाखूजन्य पदार्थ ला लोकडाऊन च्या काळात विक्री साठी परवानगी दिली आहे मात्र जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात तंबाखूजन्य पदार्थ विक्री चा उल्लेख नाही तंबाकूजन्य पदार्थ विक्री बंद असल्या मुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा कर बुडत आहे जिल्ह्याचा समावेश आरेंज झोन मध्ये आहे या झोन मध्ये केंद्र शासनाने तंबाखूजन्य पदार्थ ला विक्री करण्याची परवानगी दिलीं आहे असे असले तरी, या लोकडाऊन दरम्यान तंबाखूजन्य पदार्थांचे दर गगनाला भिडले असून, काही लोक साठे बाजी करून मोठ्या दराने विक्री करीत आहे सध्यातरी या पदार्थांचे सेवन करणे महागात पडतआहे.

राज्यात पूर्वीपासूनच तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास मुभा आहे पीडी अन पीडी जुन्या काळा पासून अनेक घरात तंबाखू जन्य पदार्थ वापरले जाते लॉकडाउन काळात तंबाखूजन्य पदार्थांचा तुटवडा जाणवत असला तरी, तंबाखू शौकीनांचे प्रेम कमी झालेले दिसत नाही. राज्यात सर्वाधिक तंबाखू खाण्याला अद्यापही ब्रेक बसलेला नाही. राज्यात तंबाखू शौकीनांची सर्वाधीक पसंती असणाऱ्या ‘खुलली तंबाखू च्या किंमतीतही कमालीची वाढ झालेली दिसून येते.
मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्राचा नियम आहे. जिल्ह्यात तंबाखू विक्रीवर पूर्णतः बंदी आहे. एरवी छुप्यामार्गाने येणारी सुपारी, तंबाखू, गुटखा आणि सिगारेटची आयात बंद झाल्याने मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

तूर्तास खुल्या तंबाखुवर तलफ भागविणाऱ्या शौकीनांची मोठी पंचायत झाली आहे. आज पासून दारूची दुकाने सुरू झाली आहेत आता पानटपरी उघडण्या बाबत परवानगी देण्यची मंगणी विक्रेत्यांनी व तंबाखू शौकीनांनी केली आहे ,वयवसाय बंद असल्या मुळे गरीब विक्रेत्यावर उपासमारीची पाळी आली आहे शासनाचा ही कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे , पान तंबाखू सुपारी खाणे हे राजा महाराजांच्या काळा पासून चालत आलेले आहे जिल्हा प्रशासनाने जसे दारू च्या बाबतीत आदेश दिले आहेत तसेच आदेश तंबाखूजन्य पदार्थ विक्री ला दयावे ,