Home मराठवाडा अनिरुद्ध नांदेडकर यांनी पत्रकारांशी केलेल्या गैरवर्तुणुकीची तक्रार थेट विशेष पोलीस महासंचालक यांचेकडे….!

अनिरुद्ध नांदेडकर यांनी पत्रकारांशी केलेल्या गैरवर्तुणुकीची तक्रार थेट विशेष पोलीस महासंचालक यांचेकडे….!

394
0

अंबड शहरातील सर्व पत्रकारांनी डि.वाय एस पी शेवगण यांची भेट घेवून कैफियत मांडली….!!

जालना / अंबड – पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी वर्तमानपत्रात व वेबपोर्टल वर आलेल्या बातमीचा मनात राग ठेवुन काही पत्रकारांशी मुद्दामहून गैरवर्तन करून कोवीड-19 संबधी वृत्ताकंन करण्यास अडथळा निर्माण केला असुन व्यथित पत्रकारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सी.डी शेवगण यांची भेट घेवून पी.आय नांदेडकर यांच्या खातेनिहाय चौकशीची मागणी निवेदनाद्वारे विशेष पोलीस महासंचालक परिक्षेत्र औरंगाबाद यांचेकडे केली आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेमार्फत विशेष पोलीस महासंचालक औरंगाबाद यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे कि पत्रकार रामभाऊ लांडे हे काल दि.4/5/2020 रोजी स्था.गु.शा ने केलेल्या कारवाईच्या वृताकंनासाठी इतर पत्रकारासमवेत गेले असता पी.आय नांदेडकर यांनी जानिवपुर्वक अपमानास्पद वागणुक देत पोलीस स्टेशन येथे बसवुन बातमीबाबत स्टेटमेंटची मागणी केली.

पंधरा दिवसापूर्वी तरुण भारतचे पत्रकार लक्ष्मण राक्षे यांना पोलीसांनी मारहाण केली होती तर वृत्ताकंन करणाऱ्या अनेक पत्रकारांचे वाहन कारण नसतांना पोलीस स्टेशन येथे लावण्यात आलेले आहेत अंबड परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारु,हातभट्टी, गुटखा, तंबाखू विक्री च्या बातम्या तसेच पोलीस चेकपोस्ट वर मनमानी कारभार करणाऱ्या पोलीसांच्या बातम्यांचा मनात राग ठेवून पी.आय.नांदेडकर पत्रकारांना त्रास देत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी अंबड शहरात केलेल्या छाप्यामुळे पी.आय नांदेडकर यांच्या काळ्या कारभाराचा भांडाफोड झाल्याने त्यांनी पत्रकारावर आकस काढायला सुरवात केल्याने त्यांच्या गैरकारभारविरुद्ध सर्व पत्रकारांनी एकजूट करुन पी.आय नांदेडकर यांची खातेनिहाय चौकशी करुन त्यांचेवर कठोर कारवाई ची मागणी केली आहे निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी जालना, जिल्हा पोलीस अधिक्षक जालना, उपविभागीय अधिकारी अंबड,तसेच पत्रकार संघटनांच्या सर्व जिल्हाध्यक्ष यांना पाठवली असुन निवेदनावर
१) संतोष जिगे- दै.पार्श्वभूमी
अध्यक्ष पत्रकार संघ
2) प्रकाश नारायणकर-मा.अध्यक्ष पत्रकार संघ
3) सोहेल चाऊस- दै.भास्कर
4) अशोक शाह-दै.दिव्य मराठी
5) रामभाऊ लांडे-मराठा टीव्ही वेबपोर्टल
6) नंदकुमार उढाण-सा.जनाश्रु
7) सतीष देशपांडे -दै.पुढारी
8) अशोक डोरले-दै लोकमत
9) सिध्देश्वर उबाळे-दै.सामना
10) सुरेश भावले-दै.पुण्यनगरी
11) बळीराम राऊत-सा.अंबडवार्ता
12) अशोक खरात-दै.दुनियादारी
13) लक्ष्मण राक्षे-दै.मुबंई तरुण भारत
14) नाजिम सय्यद-सा.राजकीय तुफान
15) जहीर शेख-दै.जगमित्र
16) रामदास पटेकर-दै.पुढारी
यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.