Home मराठवाडा लोकडाऊन सुरू असतांना जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा 7 जुगारींना अटक ,

लोकडाऊन सुरू असतांना जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा 7 जुगारींना अटक ,

56
0

सय्यद नजाकत

बदनापूर, दि. 4 (प्रतिनिधी): तालुक्यातील भाकरवाडी येथे जिल्हाधिकाऱ्यांचा जमाव बंदीचा आदेशाचे उल्लंघन करून जमाव जमा होऊन गोलाकार बसून पत्त्यावर जुगार खेळत असलेल्या जमावाला बदनापूर पोलिसांनी धाड टाकून 7 जणांवर गुन्हा नोंद केला आहे.

तालुक्यातील भाकरवाडी येथे 3 मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास बदनापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मारोती खेडकर हे जिल्हा जमावबंदीच्या आदेशाचे पालन करत असताना सार्वजनिक ठिकाणी सात जणांचा जमाव गोलाकार बसून पत्त्यावर जुगार खेळत असल्याचे दिसून आल्यामुळे पोलिसांनी वैजीनाथ मिसाळ,नंदू अंबादास तिडके, रामदास म्ळसलकर, शफिक सत्तार खॉ पठाण, राहुल साहेबराव मिसाळ, अप्पासाहेब रमेश हिवाळे, युनूस अहेमद शहा यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून एक पत्त्याचा कॅट व 6880 रुपये आढळून आल्यामुळे पोलिस नाईक राधाकिसन मिसाळ यांच्या फिर्यादीवरून वरील आरोपींविरुध्द जिल्हाधिकारी, जालना यांनी दिलेल्या कोरोना विषाणूमुळे उदभवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जालना जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) प्रमाणे बंदचे आदेशाचे उल्लघंन केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शेळके यांच्याकडे देण्यात आली असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.