Home विदर्भ मी पूर्णत अंध , “मला न्याय द्या” – रामेश्वर चव्हाण

मी पूर्णत अंध , “मला न्याय द्या” – रामेश्वर चव्हाण

553

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ – मी रामेश्वर दिगंबर चव्हाण मुक्काम काकडदरा पोस्ट जवळा तालुका आरणी जिल्हा यवतमाळ येथील रहिवाशी असून मी पूर्णतः अंध आहे माझे प्राथमिक शिक्षण वाशिम मध्ये अंधशाळेत पूर्ण झाले आहे तसेच आठ ते दहा म्हणजेच मेट्रिक ही अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुका भारतीय ज्ञानपीठ मूर्ती मूर्तिजापूर येथे ते पूर्ण केले आहे.

त्यानंतर बाहेर जाणे परवडत नव्हते म्हणून अकरावी-बारावी गावाजवळच असलेले श्री गुरुदेव विद्या मंदिर जवळा येथून पूर्ण केली त्यानंतर मला पदवीसाठी पुण्याला जायचे होते परंतु परिस्थिती बेताची असल्यामुळे मी तिथे जाऊन शिक्षण घेणे हे तर कठीण होते परंतु कालांतराने समाज कल्याण चे वस्तीगृह मिळाले व माझे जेवण व राहण्याची सोय झाली त्यानंतर तीन वर्षे पुण्यात राहून मी माझी पदवी पूर्ण केली एकंदरीत कसाबसा तरी शिक्षण पार पडलं होतं परंतु समाजामध्ये लोकांवर होणारा अन्याय बघून मलाही असं वाटलं की आपणही समाजाचे काहीतरी देणं लागतो म्हणून मी वकिलीच्या शिक्षणाला सुरुवात केली वकिलीचे शिक्षण पूर्ण करणे माझ्यासाठी फार अवघड होते कारण यवतमाळ मध्ये राहून वकिलीचे शिक्षण पूर्ण करू शकेल एवढी माझी शपथ नव्हती परंतु लोकमत च्या वार्ताहरांशी संपर्क साधला व लोकमत’ने मला वस्तीगृह मिळवून दिले आज त्यांनी वस्तीगृह मिळवून दिले म्हणून माझे जेवण व राहणे सोयीचे झाले व त्यामुळे मी माझे वकिलीचे शिक्षण पूर्ण करू शकलो तर वेळोवेळी मला लोकमत’ने न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे कारण मी राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेला बसलो असताना देखील मला लेखणी का चा फॉर्म न भरल्यामुळे परीक्षेला बसू दिले नव्हते परंतु लोकमत मी त्याची सुद्धा दखल घेतली व त्यानंतर आयोगांनी मात्र त्यावर लक्ष दिले व दिव्यांगांना लेखनिक फॉर्म भरता कसा येईल या संबंधित जनजागृती केली एकंदरीत लोकमत मला यश मिळवण्यास फार मदत झाली लोकमतचे वार्ताहार हरिओम बघेल असो अथवा अविनाश साबापुरेअसो या सर्व लोकमत मला नेहमीच न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेपरंतु मी पूर्णतः अंध असल्यामुळे वाचन करू शकत नव्हतो शिवाय ब्रेल लिपीतील पुस्तकही उपलब्ध नव्हते त्यासाठी एवढ्या सगळ्या पुस्तकांची रेकॉर्डिंग मिळणे ही अवघड होते म्हणून मला तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अभ्यास करण्याची गरज भासू लागली त्यादरम्यान मला असे समजले की प्रत्येक ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद यामधून अपंगांसाठी तीन टक्के इतका निधी दिला जातो त्यासाठी मी ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच यांच्याकडे वारंवार मागणी केली परंतु त्यांनी आज देऊ उद्या देऊ असे प्रत्येक वेळी उडवाउडवीचे उत्तर देऊन माझी टाळाटाळ केली त्यानंतर हा निधी तीन टक्क्यांवरून पाच टक्के इतका झाला व जिल्हा परिषद यांनी लॅपटॉप देण्याचे एका जीआर मध्ये नमूद केलेले शासनाचा हा जीआर 2018 माझ्याकडे होता त्यानुसार मी जिल्हा परिषदेकडे आपले सरकार या पोर्टल थ्रू मागणी केले परंतु त्यांनी प्रत्येक तक्रारीला वेगवेगळे उत्तर देऊन माझी गरज पूर्ण केली नाही दिव्यांगांना लॅपटॉप देणे त्या जीआरमध्ये तरतूद असूनही त्यांनी मला एकट्यासाठी लॅपटॉप देणे अशक्य आहे किंवा आम्ही फक्त झेरॉक्स मशीनचा देतो असे वेगवेगळे उत्तर दिली एकंदरीत जिल्हा परिषदेमध्ये मी त्यांनी मला झेरॉक्स मशीन देण्याचे सांगितले परंतु मी झेरॉक्स मशीन घेऊ शकत नाही कारण त्याची मला गरज नाही मी शिक्षण घेत असल्यामुळे त्यात वकिलीचे शिक्षण घेत असल्यामुळे मला लॅपटॉप ची नितांत गरज आहे एवढे असून देखील मला जिल्हा परिषद यांनी वारंवार नकारार्थी उत्तर दिले जिल्हा परिषद सर्व दिव्यांगांना पाच टक्के निधी खर्च तर करणे अनिवार्य दाखवते तसेच जिल्हा परिषद घर पट्टी ज्याला आपण पाणीपट्टी म्हणतो हे निमे भरणे असा जीआर असूनदेखील जिल्हा परिषद दिव्यांग यांकडून निम्मी घरपट्टी न घेता पूर्ण घर टॅक्स वसूल करते तसेच आजपर्यंत दिव्यांगांना आमच्या ग्रामपंचायतीतील दिव्यांगांना घरकुल योजनेचा सुद्धा लाभ मिळालेला नाही कारण इतर सर्व तरतूद आहे परंतु दिव्यांगांना शासन सुरुवातीला दाखवतो परंतु त्याच्यापर्यंत योजनाच पोहोचत नाहीतसेच आज भारतात सर्वत्र लोक डाऊन सर्वत्र लोक डाऊन असल्यामुळे दिव्यांगांना हालचाल करणे व इतर सगळ्याच गोष्टी अवघड झाल्या आहे यादरम्यान शासनाने प्रत्येक दिव्यांगांना निधी द्यावा त्यांच्या खात्यात निधी द्यावा तसेच त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करावे असे सांगून देखील फक्त मलाच नाहीतर यवतमाळमधील बहुतांशी लोकांसोबत हा गैरप्रकार घडत आहे प्रत्येक ग्रामीण भागातील काही लोक सुशिक्षित तर काही अशिक्षित असतात त्यामुळे हा जाब त्यांना कोणी विचारू शकत नाही व एकंदरीत त्या संपूर्ण लोकांवर अन्याय केला जातो व त्यांना एकही वर्षे हा निधी दिला जात नाही तर आपण सगळ्यांनी याबाबत जागृक राहायला हवे मला आज एकच सांगायचे आहे की मी वारंवार तक्रार देऊन वारंवार सरपंच उपसरपंच यांना बोलून देखील माझ्या तक्रारीचे व बोलण्याचे कुठेही दखल घेतली जात नाही तर अशिक्षित असलेले ग्रामीण भागातील लोकांचं काय होत असेल बहुतांशी लोकांना तर या योजनेबद्दल माहीतच नाही परंतु माहितही जरी असेल तरी अशा प्रकारचे राजकीय दबाव व त्यांचा कडे असलेल्या पावर चा दुरुपयोग करून त्यांची गळचेपी केली जात आहे यासाठी कोणीच पुढे सरसावत नाही दिव्यांगांचे आधारस्तंभ असलेले बच्चुभाऊ कडू यांनी ज्या ठिकाणी लक्ष घातले तिथे मात्र सर्व सुरळीत चालू आहे आमच्या यवतमाळ मागास असल्यामुळे आमचा यानंतर सर्वात शेवटीच नंबर लागेल असेच वाटत आहे कारण प्रत्येक गोष्टीत यवतमाळ जिल्ह्यातील लोकांवर अन्यायच होतो आज मला सांगायचं एवढच की तक्रार तर प्रत्येक व्यक्ती देतो देण्याची इच्छा ही बाळगतो परंतु त्यानंतर त्यावर राजकीय दबाव येण्याची व त्याला सहकार्य करण्याची भीती देखील असते मलाही अशा प्रकार ही तक्रार देताना अशा प्रकारचं दडपण येत आहे माझ्या यानंतर माझ्याबरोबर कुठल्या प्रकारचा गैरव्यवहार किंवा काहीही होऊ शकतं शासनाकडून येणाऱ्या योजना या प्रत्येक ग्रामीण भागातील सरपंच उपसरपंच शासकीय कर्मचारी तिकडेच गिळंकृत केल्या जातात माझा पत्ता मी वर नमुद केले असुन खाली भ्रमण ध्वनी. क्र व ई मैल आय डी mo ८९९९६१४६५० ,९९२११४३१५४ email id.rameshwarchavan१८@gmail.com