Home जळगाव मौलाना वरील भ्याड हल्ला प्रकरणी दोन आरोपी अटक

मौलाना वरील भ्याड हल्ला प्रकरणी दोन आरोपी अटक

92
0

पोलिसांची कामगिरी

जळगाव : एजाज़ शाह
३० एप्रिल रोजी रात्रि मौलाना हाफिज़ कौनेन हे तरावीह ची नमाज मक्का मस्जिद,जैनाबाद येथे अदा करून आपल्या घरी गेंदालाल मिल परिसर येथे सायकलिने जात असतांना भाजपा कार्यालय व आर्य हॉस्पिटल च्या मधे पाठी मागून मोटर सायकलिने येऊन त्यांच्या पाठीवर मोठा दगड मारून पळून गेलेले आरोपि विरुद्ध शहर पो स्टे ला दुसऱ्या दिवशी मुफ़्ती अतीकुर्रहमान व फारूक शेख यांनी मौलाना कोनेंन यांना घेऊन जाउन रितसर तक्रार दिली होती व त्या प्रकरणी भा द वी ३३७ व ३४ प्रमाणे दखल पात्र गुह्याची नोंद करण्यात आली होती.
सदर प्रकरणी पोलीस निरीक्षक भीमराव नांदुरकर यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक नाइक साहेब यांच्या मार्गदर्शन खाली तपास केले.
सदर प्रकरणी पोलिसांनी गोपनीय महितीच्या आधारे आरोपी ची माहिती जमा करून व
अत्यंत महत्वाचे साक्षीदार हेरुन
पोलिसांनी त्वरित खालील दोन आरोपिन्ना २ मे रोजी शितफिने अटक केली

१)विनोद भीका पाटिल,वय 37, रा. धनाजी काळे नगर,जळगाव
२)अमोल दीलिप सालुंखे, वय २०, रा जैनाबाद, जळगाव
आज ३ मे रोजी त्यांना मा न्यायालयात हजर केले असता सदर गुन्हा हा जामीन पात्र गुन्हा असल्याने त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

पोलिसांनी अवघ्या दोनच दिवसात आरोपी निष्पन्न केल्या बद्दल फारूक शेख यांनी पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले,अपर पोलीस अधीक्षक सौ भाग्यश्री नवटके,सहा पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन,पोलिस निरीक्षक निकम व नंदुरकर तसेच पोलीस सहकारी यांचे आभार मानले आहे.