Home विदर्भ इंदिरानगर , पवारपुरा भागात नगरसेवक जावेद अन्सारी यांच्या वतीने 650 कुटुंबाना किराना...

इंदिरानगर , पवारपुरा भागात नगरसेवक जावेद अन्सारी यांच्या वतीने 650 कुटुंबाना किराना साहित्य किट वाटप

107

कोरोनामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना दिला मदतीतून दिलासा…!

यवतमाळ – दिनांक 2 – कोरोना प्रार्दुभावामुळे सार्वजनिक संचारासाठी प्रतिबंधित करण्यात आलेल्या पवारपुरा,इंदिरानगर भागात 1 मे महाराष्ट्र दिन रोजी प्रभाग 10 चे नगरसेवक व जिल्हा कांग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष जावेद अन्सारी यांच्याद्वारे गरजू नागरिकांना मोठ्या प्रमाणात किराना साहित्य वाटप करण्यात आले.कोरोना कोविड-19 संसर्गमुळे यवतमाळ शहरातील या दोन्ही भागासह अनेक क्षेत्र प्रशासनाने पूर्णतः सील केले आहे.

9 एप्रिलपासून नागरिक लॉक डाऊन व सील असल्याने पवारपुरा,इंदिरा नगर,हिन्दू स्मशानभूमि परिसरात नागरिक घरातच बंदिस्त आहेत. हा भाग 9 एप्रिल पासून सार्वजनिक संचाराकरिता प्रशासनाने प्रतिबंधित केले आहे.
या प्रतिबंधित भागातील सर्वधर्मीय गोरगरीब,गरजू रहिवासी नागरिकांच्या कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य मिळने कठिन बनले आहे.येथील नागरिकांची गरज पाहता या प्रभागाचे ज्येष्ठ नगरसेवक व जिल्हा कांग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष जावेद परवेज़ अन्सारी यांच्याद्वारे मोठ्या प्रमाणात या भागात मदत वितरित करण्याचे काम सुरु आहे.1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त नगरसेवक जावेद अंसारी यांच्या मार्फ़त या भागात गरजू कुटुंबाना 650 किराना साहित्य किट वाटप करण्यात आली.विशेष म्हणजे या भागात राहणारे बहुतांश नागरिक गरीब,मजदूर,रिक्शाचालक,भंगार,फळ भाजी विक्रेते आहेत,दररोज हातावर आणून पानावर खाने अशी येथील गरीब कुटुंबांची अवस्था आहे,16 दिवसांपासून येथील नागरिकांचे कामकाज पूर्णतः बन्द आहे, त्यामुळे या भागातील शेकडो गरीब गरजू कुटुंबाना 2 वेळच्या जेवनाची व्यवस्था होने कठिन बनले आहे.
आपल्या प्रभागातील कुटुंबांची दैनंदिन गरजा
पूर्ण होत नसल्याची बाब लक्षात घेत
नगरसेवक जावेद अन्सारी यांनी आपल्या क्षेत्रातील नागरिकांवर आलेल्या या मानवीय आपत्तीच्यावेळी आपली दानशूर वृत्ती व सामाजिक,राष्ट्रीय एकता,बंधुत्व व सेवाभाव चे दर्शन घडविले आहे.या भागातील 650 गरजू कुटुंबासाठी नगरसेवक जावेद अंसारी यांनी स्वखर्चातुन किराना सामान खरेदी केले.गरजुना वाटप केलेल्या या किराना किट मध्ये 10 किलो तांदूळ,1 किलो तेल,1 किलो तुर डाळ,1 किलो साखर,1 पाव चहा पत्ती, नमकपुडा,मसाला पुडा,पेंड़खजुर पैकेट चा समावेश होता,ह्या सर्व किट इंदिरा नगर,पवारपुरा,स्मशानभूमि परिसरातील प्रत्येक घरात पोहोचुन ही मदत वाटप करण्यात आली.या राशन किट पॅकिंग व वाटप करिता एमआईएम चे शहर अध्यक्ष शेख चाँद मोहम्मद व त्यांची टीम ने कठिन परिश्रम करीत वाटप कार्य केले,याकरिता त्यांना इंदिरा येथील सामाजिक कार्यकर्ते व जावेद अंसारी मित्र परिवार सदस्य यांनीही मदत केली.या मदतिमुळे परिसरातील शेकडो गरजूना समाधान मिळाल्याची भावना वाटपच्या वेळी नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत होती.
विशेष म्हणजे जेव्हा पासून कोरोना मुळे या भागात जनजीवनावर संकट आले आहे तेव्हापासून या क्षेत्राचे नगरसेवक व स्वतःचे सामाजिक कर्तव्य या भावनेतून नगरसेवक जावेद अन्सारी नागरिकांच्या मदतिकरिता दिवसरात्र परिश्रम घेत आहेत.23 एप्रिल ला लॉक डाऊन घोषित झाल्यानंतर त्यांच्याकडून इंदिरा नगर,तारपुरा, शिंदे नगर,सारस्वत लेआऊट,कोहिनूर सोसायटी,कलम्ब चौक परिसर,लोहारा, पिम्पलगाव,वड़गाव, आदि भागातील गरजू नागरिकांना तब्बल 1300 किराना साहित्य किट वाटप करण्यात आली,यानंतर 29 एप्रिल रोजी इंदिरा नगर,पवारपुरा भागात 500 भाजी किट वाटप केली आहे.

या भागात सेनिटॉयज़िंग करणाऱ्या 10 सफाई कर्मचारीना त्यांनी स्वखर्चाने पीईपी सुरक्षा किट उपलब्ध केली आहे.याच दरम्यान या भागात गरजू लोकांना दररोज दूध मिळावा यासाठी यवतमाळ जिल्हा कांग्रेस कमिटीच्या वतीने नियोजन करून दूध वाटप सुरु आहे,या कामासाठी मदत करणाऱ्या कांग्रेस कमिटीच्या पदाधिकारिंचे,सार्वजनिक मदत वाटपासाठी सहकार्य करणारे पोलिस प्रशासन,नगर परिषद कर्मचारी,अधिकारींचे नगरसेवक जावेद अंसारी यांनी आभार मानून नागरिकांनी लॉकडाऊन पर्यंत आपल्या घरातच राहून कोरोंना वायरस सोबत लढा देत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान केले आहे.