Home महत्वाची बातमी पिठाच्या गोण्या मधून गुटखा तस्करी 23 लाख रुपयांच्या गुटखा सह 45 लाखांचा...

पिठाच्या गोण्या मधून गुटखा तस्करी 23 लाख रुपयांच्या गुटखा सह 45 लाखांचा मुद्देमाल जप्त ,

46
0

पोलिसांची मोठी कार्यवाही ,

अँड , ताज अहेमद अन्सारी ,

गेवराई (जि. बीड) : अत्यावश्यक वस्तू पुरविण्याचा पास घेत पिठांच्या पोत्यांमधून गुटखा तस्करी सुरू असल्याचा अफलातून प्रकार चेकपोस्टवर उघड झाला आहे. परिसरातील महंतटाकरी येथे पोलिसांनी २३ लाखांचा गुटखा आणि १२ लाखांचा टेम्पो असा ४५ लाखांचा ऐवज पकडला.

बीडमधून परजिल्ह्यात जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात होती. यावेळी आयशर टेम्पोत (क्रमांक ए. के. ०१ – ५८५१) पीठाचे पोते परजिल्ह्यात घेवून जात असल्याचे चालकाने पोलीसांनी सांगितले. मात्र, तरीही पोलिसांना शंका आली म्हणून उघडून पाहिले तर आतमध्ये पिठांचे पोते कमी आणि गुटख्याचेच पोते अधिक आढळून आला
हा टेम्पो हैद्राबाद येथून नाशिककडे जात असल्याचे चौकशीत समोर आले. फौजदार योगेश कोरडे यांनी ही कारवाई करत टेम्पो पकडून चकलांबा पोलिसांच्या हवाली केला. पोलीस हवालदार कांबळे, कांदे, पोलिस नायक सय्यद चॉंद यांनी कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान, अन्न व औषधी प्रशासनाचे अन्नसुरक्षा अधिकारी ए. बी. भिसे, एच. आर. मरेवार यांनी चकलांबा येथे जाऊन पकडण्यात आलेल्या गुटख्याचा पंचनामा केला.

सध्या अनेक गोष्टींच्या काळ्या बाजारात किंमती वाढल्या आहेत. गुटखा, तंबाखू, देशी-विदेशी दारू आणि इतर व्यसनांच्या वस्तूंचा लॉकडाऊनमध्ये चढ्या भावाने विक्रय सुरू आहे. मात्र, पोलिस प्रशासनाने काही कारवाया केल्या, तरी काळा बाजार करणारे काही ना काही शक्कल लढवून माल बाजारात आणून विकत आहेत.