Home मराठवाडा नांदेड पुन्हा हादरले सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या महिलेचा दुपारी मृत्यू तर आणखी...

नांदेड पुन्हा हादरले सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या महिलेचा दुपारी मृत्यू तर आणखी दोघा जणांचे अहवाल पाझिटिव्ह – रविवारी पुन्हा ५ नवे रुग्ण भर

138
0

राजेश भांगे

नांदेड – नांदेड मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून सकाळी तिघा जणांना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा अद्याप सुरूच असताना दुपारी आणखी दोघा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नांदेड शहर आणखी हादरले आहे.शनिवारी २० आणि रविवारी ५ नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याने ही संख्या आता ३१ वर पोहचली आहे.आज आढळून आलेल्या ५ पैकी एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या महिलेचा दुपारी मृत्यू
● गेल्या काही दिवसांपासून आजारी होती महिला
● तिच्यावर “सारी” आजारा संबंधित सुरू होते उपचार
● नांदेडच्या रहमतनगर भागातील होती महिला
● गुरुद्वारा परिसरातील आणखी दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह
● बाधितांची एकूण संख्या ३१ वर
● आतापर्यंत मृतांचा आकडा ३