Home बुलडाणा एक हात मदतीचा , देऊळगाव माळी येथे २५० गरजुंना किराणा साहित्याचे वितरण…..!

एक हात मदतीचा , देऊळगाव माळी येथे २५० गरजुंना किराणा साहित्याचे वितरण…..!

306

देऊळगाव माळी – प्रतिनिधी

बुलडाणा – १ मे रोजी कोरोनाला थोपविण्यासाठी आता संपूर्ण भारतात लॉक डाऊन असल्यामुळे ३ मेपर्यंत लॉक डाऊन वाढविण्यात आल्याने लोकांना जीवनाश्यक साहित्य मिळावे म्हणून आरोग्याची सेवा देणारे डॉ.अमोल गवई व त्यांचे सहकारी देखील सरसावले आहे.त्यांनी १मे रोजी देऊळगाव माळी येथे २५० कुटूंबियांना साहित्याचे वितरण करण्यात आले आहे.वाढत चाललेल्या कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात ३ मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हातावर पोट असलेल्या गोरगरिब व मजूर यांच्या पुढे खूप संकट निर्माण झाला आहे. अशा या परिस्थितीत, एक हाथ मदतीचा म्हणून देऊळगाव माळी गावातील भुमीपञ व ग्रामीण रुग्णालय डोणगांव येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देत असलेले डॉ.अमोल श्रीराम गवई व सहकारी यांनी देऊळगाव माळी येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. संचारबंदीच्या काळात आरोग्य विभागातील प्रत्येक डॉ. अधिकारी व कर्मचारी अखंडित आरोग्य सेवा देण्यासाठी काम करीत आहे. त्यासोबतच माणुसकीसाठी व आपली सामाजिक बांधिलकी न विसरता, डॉ.अमोल गवई व सहकारी यांनी वर्गणी करुन देऊळगाव माळी या गावात एकूण २५० घरांना प्रत्येकी २ किलो साखर ,१लिटर गोड तेल,तुर दाल ,मुंग दाल,मसाला,खोबरेल तेल ,साबन, कपडे धुण्यासाठी पावडर असे जिवन आवश्यक वस्तूचे वाटप केले. तसेच मेहकर तालुक्यातील रत्नापूर येथे सुद्धा १०० कुटुंबातील गरजूंना किराणा सामान वाटप‌ केले.या कृतीमुळे उपाशीपोटी असलेल्या देऊळगाव माळी परीसरातील गोरगरीब शेतमजुर , बांधकाम मजूर इत्यादी गरजुनां आधार मिळाला आहे. दरम्यान, यावेळी यांच्या सोबत डॉ.शिवशंकर बळी, पत्रकार कैलास राऊत, भास्कर गवई, रवींद्र मगर, आरोग्य कर्मचारी संजय घाटे, गफ्फार शाहा ,विष्णु गारोले, हरिभाऊ गवई,इ. सहभागी झाले होते. डॉक्टर अमोल गवई व त्यांचे सहकारी यांचे गावकर्यानी कौतुक केले व याप्रसंगी आर्थिक दृष्ट्यासक्षम असलेल्या लोकांनी या कोरोनाच्या संकटात शक्य असल्यास गोरगरीबांची मदत करावी, असे आवाहन डॉ.अमोल गवई यांनी केले.