Home महत्वाची बातमी केंद्र सरकारची महाराष्ट्र राज्य, जिल्ह्यातील रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये वर्गीकरण...

केंद्र सरकारची महाराष्ट्र राज्य, जिल्ह्यातील रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये वर्गीकरण यादी जाहीर

122
0

विषेश प्रतिनिधी – राजेश भांगे

रेड झोन मध्ये १४, ऑरेंज झोन मध्ये १६ तर ग्रीन झोन मध्ये फक्त ६ जिल्हे.

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागलेला असतानाच ३ मे ही लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवसाची तारीख देखील अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर आता देशभरात कशा पद्धतीने लॉकडाऊन उठवला जावा आणि त्यानंतर कोणत्या भागात कशा पद्धतीने अटी शिथील किंवा कठोर केल्या जाव्यात, यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरातल्या ७००हून जास्त जिल्ह्यांची रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन अशा तीन गटां मध्ये वर्गवारी केली आहे. त्यामध्ये राज्यातल्या १४ जिल्ह्यांचा समावेश रेड झोन मध्ये, १६ जिल्हे ऑरेंज झोन मध्ये तर ६ जिल्हे ग्रीन झोन मध्ये आहेत. दरम्यान, ही यादी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पुढच्या आठवड्या भरासाठी असणार आहे असं देखील आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहं. दरम्यान, स्थानिक पातळीवर काही प्रमाणात यामध्ये बदल होऊ शकतो, असं देखील मंत्रालयाकडून नमूद करण्यात आलं आहे.

*कोणत्या झोनमध्ये कुठले जिल्हे*

रेड झोन -१४

मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव, मुंबई उपनगर

ऑरेंज झोन -१६

रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड.

ग्रीन झोन -६

उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा.