Home विदर्भ वरुड येथे एक पाॅझिटिव्ह , “सर्वञ चिंता”

वरुड येथे एक पाॅझिटिव्ह , “सर्वञ चिंता”

50
0

मनिष गुडधे

तहसिल कार्यालयाच्या ड्रायव्हर च्या पत्नी कोरोणा पाॅझिटिव्ह

अमरावती – वरूड येथील एका महिलेला (50) ताप, सर्दी, खोकला असल्याने तीन दिवसांपूर्वी वरूड येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. सदर डॉक्टरांकडून महिलेला पुढील उपचारासाठी नागपूर येc f tथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात रेफर करण्यात आले. नागपूर येथे त्यांचा थ्रोट स्वॅब घेण्यात आला. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दूरध्वनी संदेशाद्वारे तालुका प्रशासनाला आज मिळाली. त्यानुसार सदर डॉक्टरांना व संपर्कातील व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, त्यांचे स्वॅब घेणे, आवश्यक तपासणी आदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सदर महिलेचे पती वरूड येथील तहसील कार्यालयात वाहनचालक पदावर कार्यरत असल्याचे कळते. त्यानुषंगाने आवश्यक तपासण्या होत आहेत.