Home विदर्भ देवळी नगरपरिषद, मध्ये काळ्या फिती लावुन कामास सुरवात.!

देवळी नगरपरिषद, मध्ये काळ्या फिती लावुन कामास सुरवात.!

70
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेकामी संपूर्ण राज्यातील नगरपरिषदा मधील मुख्याधिकारी तसेच त्यांचे अधिनस्त सर्व अधिकारी , कर्मचारी हे दिलेल्या आदेशानुसार सर्व भागांत समक्ष फिरून अत्यावश्यक सेवेचा पुरवठा करणे, औषध फवारणी करणे अशी कामे अहोरात्र सुरू आहेत. हे सर्व अधिकारी व कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून कामे करीत आहेत.
अशा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या यांना शासनाच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे विम्याचे संरक्षण देणेबाबत नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे वतीने वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत. परंतु याबाबत शासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी दैनंदिन कार्य नित्यनियमाने व कोरोना विषाणूचा संपूर्ण नायनाट होईपर्यंत काम करत राहणारच आहेत. तसेच सर्व सफाई कामगारांकडून देखील स्वत:चा जीव धोक्यात घालून दैनंदिन साफसफाईचे काम चालूच आहे.
परंतु राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत मधील सफाई कामगार व इतर अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जीवन विमा उतरविणे बाबत शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २७ एप्रिल रोजी नगरपरिषदेत काळ्या फिती लावून कामास सुरुवात केली.