Home मराठवाडा तहसिलदार मॅडम दिसताच लोक भयभीत होऊन पळतात ???

तहसिलदार मॅडम दिसताच लोक भयभीत होऊन पळतात ???

52
0

सय्यद नजाकत

जालना – कोरोना रोगाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून रेड झोनमधील कोणालाही प्रवेश देऊ नये. असे आदेश जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक जालना यांनी दिले होते. असे असतानाही बदनापूर येथील काही अधिकारी कर्मचारी औरंगाबादहून जाणे-येणे करत आहेत.

त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. अशा अधिकाऱ्यांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता आहे. तालुक्यात वरूडी येथे चेक पोस्ट असून या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त असताना व या ठिकाणाहून पास असलेल्या वाहनांनाच सोडण्यात येते. तरी देखील काही छुप्या रस्त्याने ही वाहतूक होत असल्याचेही दिसून येत आहे. आज तर बदनापूरच्या तहसीलदारच रेड झोनमधून आल्याचे अनेकांनी पाहिले असल्याचे सांगत आहेत.