Home जळगाव मा. आ. जालमखा तडवी आदिवासी तडवी भिल समाजाचे दिपस्तंभ – नासेर खा...

मा. आ. जालमखा तडवी आदिवासी तडवी भिल समाजाचे दिपस्तंभ – नासेर खा तडवी

173
0

जळगाव जिल्हाचे तडवी भिल समाजाचे पहिले आमदार तसेच समाजास संविधानातील कलम ३४२(१)मधील अनुसूचित जमातीच्या सुचीमध्ये समाविष्ट करण्यात सिंहांचा वाटा असलेले स्व. माजी आमदार जालमखा संडेबाज खा तडवी यांची आज पुण्यतिथी आदिवासी तडवीभिल समाजाचे आदर्श दिपस्तंभ, ज्यानी आपले लहान भाऊ हसनखा खान संडेबाजखा तडवी यांचे मदतीने समस्त आदिवासी तडवीभिल समाजाचे शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी प्रस्ताव तयार करून भारतीय संविधानातील कलम 342(1) मधील अनुसूचित जमाती यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी सादर केला होता त्यानुसार भारत सरकार चे दि.६/९/५० च्या गॅझेट मध्ये तत्कालीन मुंबई राज्य मधील अनुसूचित जमाती यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले, त्यामुळे आदिवासी तडवीभिल समाजाला आरक्षण मिळवून दिले, त्या समाजाची शैक्षणिक, सामाजिक प्रगतीला सुरवात झाली. त्याकाळातील अर्ध शिक्षीत लोकांना हे सहन न झाल्याने व अज्ञान असलेल्या लोकांनी “पठानना भिल बनविले “म्हणून त्याना शिवीगाळ केली, त्याचेवर शेण-गारा,दगड फेकण्यात आले, त्याचे मुळे समाजाची शैक्षणिक प्रगती होऊन आज शेकडो शिक्षक, पोलिस, कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर, वकील, इंजिनीअर या समाजात निर्माण झाले, आज त्यांची पुण्यतिथी असून त्याच्या या कार्याला कोटी कोटी सलाम. जालमखा संडेबाजखा तडवी, जन्म १८९९ साली कुसुंबे तालुका रावेर या ठिकाणी गिरीजन जमातीतील घराण्यात झाला. लहानपणी वडील वारलयाने आई व मोठे भाऊ यांनी पालनपोषण केले, वयाच्या १७व्या वर्षी फायनल झाले, आपल्या समाजाची सुधारणा शिक्षणावाचून होणार नाही हे ओळखून त्यानी शिक्षकाचा पेशा पत्करला, १९१८ सालात ट्रेनिंग कॉलेजात प्रवेश करून १९२१ साली प्रमाणपत्र मिळवून नोकरी केली, शासनाने १९२५ साली गिरीजन समाजाची सुधारणा करण्यासाठी साकळी तालुका यावल येथे मुद्दाम नेमले, त्यानी तडवी शिक्षण मंडळ स्थापन केले, १९३५ साली यावल येथे तडवी बोर्डिंग स्थापन केली, जिल्ह्यातील एक नामांकित शिक्षक म्हणून त्याना जळगांवचे मराठा शिक्षण सहकारी मंडळाने समाज शिक्षक म्हणून सरकार कडून मागून घेतले, १९४६ साली त्याना पुणे जिल्ह्यात असि.डे.एजे.इनसपेकटर म्हणून नेमले, त्यानी १९४८ सालापासून लोकशिक्षणाचे प्रसार सुरू केला, १९५१ साली जुन्नर तालुका मुंबई राज्यात पहिला आला, म्हणून त्याना १९५२ साली आदिवासी जमातीतील एक सुसंस्कृत व शिक्षण कार्यकर्ता या नात्याने आमदारकीचे टिकीट भडगाव-चाळीसगाव मतदार संघातून मिळाले ते निवडून आले, त्या नी कायदे मंडळातून त्यानी शिक्षण व मागासलेल्या जमाती बाबत भाषणे करून सरकारला सूचना केल्या, त्यांनी तडवी-भिल समाजाला आरक्षण मिळवून दिले, नंतर ते १९५७ साली चोपडा-अंमळनेर या मतदारसंघातुन आमदार म्हणून निवडून आले, त्यानी समाजाला शिक्षणाची गरज समजावून सांगितले, त्याना दिनांक २७/४/१९७२ साली वयाच्या ७३व्या वर्षी देवाचा घरी जावं लागलं, आज तारखेनुसार त्याची बरशी पुण्यतिथी आहेत त्यांनी तडवी भिल्ल समाजाची शैक्षणिक प्रगती साठी हक्कांसाठी अहोरात्र झटत न्याय मिळवून दिला अशा तडवी भिल्ल समाजाच्या दिपस्तंभास विनम्र अभिवादन. सौजन्य मुबारक तडवी रावेर

लियाकत शाह एम ए बी.एड
महाराष्ट्र राज्य कार्यकारी समिति सदस्य,
अखिल भारत जर्नालीस्ट फेडरेशन