Home विदर्भ विद्यापीठातील सर्व विध्यार्थ्यांनाची परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रमोट करा होम असाईनमेंट...

विद्यापीठातील सर्व विध्यार्थ्यांनाची परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रमोट करा होम असाईनमेंट द्या आणि विद्यार्थ्यांनाचा मानसिक ताण कमी करा.!

39
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

मोहित सहारे यांची शिक्षणमंत्री , राज्यपाल , मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे मागणी..

वर्धा – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता या वर्षी राष्ट्रीय आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन जनहिताचा व विद्यार्थी हिताचा दृष्टिकोनातून सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निंर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे ओझे कमी करावे.विद्यार्थ्यांना होम असईनमेंट देऊन सरासरी मागील गुणवत्ता लक्षात घेऊन निकाल जाहीर करावा.
सध्या राज्यातील विद्यार्थी हा परीक्षा कधी होईल कश्या स्वरूपात होतील या प्रश्नानांनी संभ्रम अवस्थेत असून मानसिक ताण वाढत आहे.परंतु कालच मा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत साहेबांनी परीक्षा संदर्भात आठ दिवसात निंर्णय घेण्यात येईल असे ट्विट द्वारे कळविले आहे.
परंतु सद्या महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील काही प्रमाणात सिल्याबस पूर्ण होणे देखील अपूर्ण होते अचानक लॉकडाऊन लावल्याने विद्यार्थ्यांन कडे पुरेसा नोट्स देखील उपलब्ध नाहीत.सद्या नोट्स मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना कुठे जा ये करणे देखील करता येणार नाही. जास्त करून बाहेरगावी शिक्षणासाठी असलेले विद्यार्थ्यांनचे याच्यात हाल होणार आहेत.तसेच अश्या परिस्थितीत आता परीक्षा संदर्भात निर्णय घेतला तर पुढील शैक्षणिक वर्षाचा विचार करता
जे विद्यार्थी फायनल ईयर ला आहे अश्या विद्यार्थ्यांना च्या परीक्षा लॉकडाउन संपताच लवकरात लवकर घ्यावा.व इतर विद्यार्थ्यांना असिसमेंट लेवल वर पुढील वर्षात प्रमोट करून विद्यापीठानी ऑनलाईन क्लासेस घेऊन पुढील अभ्यासक्रम सूरु करण्यास बाध्य करावं.आणि पुढे देखील क्लास सुरू होण्याच्या आधी विद्यार्थ्यांना नोट मिळाल्या.तर अश्या अभुतपुर्व स्थितीत कायम स्वरूप तयार राहतील.अश्या सर्व गोष्टीचा विचार करून विद्यार्थ्यांनाचा हिताचा निर्णय घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी विध्यार्थी नेते मोहित सहारे यांनी मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच यांना इमेल द्वारे पत्र पाठवून मागणी केली आहे.