Home मराठवाडा नांदेड शहरा मध्ये कोरोणाच्या पार्श्वभूमीवर होत असलेली तपासणी म्हणजे उंटावर बसुन शेळ्या...

नांदेड शहरा मध्ये कोरोणाच्या पार्श्वभूमीवर होत असलेली तपासणी म्हणजे उंटावर बसुन शेळ्या राखणे

161

नांदेड , ( राजेश भांगे ) – नांदेडच्या अबचलनगर कोरोनाचा एक रुग्ण आढळल्यामुळे हा परिसर कंटेनमेंटझोन म्हणून सील केला आहे . जनतेने घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे जिल्हाधिकारी यांनी नांदेडकरांना केले आवाहन,कंटेनमेंट भागातील अबचलनगरमध्ये सकाळपासून आरोग्यतपासणी सुरु झाली आहे.

तरी पिरबुरहाणनगर व अबचलनगरा येथे होत असलेल्या तपासणी दरम्यान येवढ्या दुरून चेक केल्यावर येईल का अंदाज कोरोणा रूग्णांचा ? असा प्रश्नच आहे.
आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे सुरक्षेचे कोणतेही साधने पीपीई किट नसल्याच्या भीती पोटी अशीच तपासणी करावी लागत असेल, तर अशी तपासणी करूच नये. सुरक्षेचा प्रश्न मान्य आहे पण हा उंटावर बसुन शेळ्या राखण्याचा प्रकार (धोका ) सर्वांनाच फार महाग पडु शकतो असे जनसामान्यांतु बोलले जात आहे.