Home जळगाव पाचोरा येथे शिवथाळी भोजनचे शुभारंभ

पाचोरा येथे शिवथाळी भोजनचे शुभारंभ

69
0

निखिल मोर

पाचोरा – सध्या देशात कोरोना या जीवघेण्या आजारा पासून सुरक्षित राहण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने लॉकडाऊन केले आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक गोरगरीबांचे तसेच हात मजुरांचे काम बंद असल्यामुळे कुटुंबाची भूक भागवण्यासाठी त्यांना मदतीचा हात देण्याची गरज असतांना अशा परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवथाळी भोजन पाच रुपयांमध्ये सुरुवात केल्याने गोरगरिबांना शिव थाळीही जीवनदान देणारी ठरत आहे. ही शिवढाळी भोजन शहरातील नविन भाजी मंडई जवळ व तहसिल परिसरात शिव थाळी भोजनचे शुभारंभ दि. २७ रोजी आमदार किशोर पाटील, यांचेहस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, तहसिलदार कैलास चावडे, नगराध्यक्ष संजय गोहिल, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, पुरवठा तहसिलदार पूनम थोरात, पुरवठा अधिकारी, अविनाश आंधळे, उमेश शिर्के सोशल डिस्टंन्शींग पाळत व तोंडाला मास्क लावुन उपस्थित होते. याप्रसंगी आमदार किशोर पाटील यांनी शहरातील गोरगरीब नागरिकांनी शिवथाळी भोजनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.