Home विदर्भ प्रभाग क्र.१० व २०च्या नगरसेवकांसोबत जिल्हाधिकारी यांची बैठक

प्रभाग क्र.१० व २०च्या नगरसेवकांसोबत जिल्हाधिकारी यांची बैठक

53
0

प्रतिबंधित क्षेत्रातील ५५० घरांना नगरसेवक करणार ५५० धान्य किट चे वाटप.

यवतमाळ , दि. २७. :- कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
कोरोणाचे पॉझिटीव्ह पेशंट दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने काही भाग प्रतिबंधित केले गेलेले आहे तसेच या प्रतिबंधित क्षेत्रासाठी विविध प्रभावी उपाय योजनांवर चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील नगरसेवकांसोबत जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी आढावा बैठक घेतली.
यावेळी प्रभाग क्रमांक 10 चे नगरसेवक जावेद परवेज अन्सारी व प्राध्यापक प्रवीण प्रजापती यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली की ते फोनच्या माध्यमातून आणि विविध माध्यमातून लोकांमध्ये सोशल डिस्टेनसिंग पाळावे यासाठी जनजागृती करावी,एकमेकांच्या घरात जमू नये,त्याचप्रमाणे मशिदीमध्ये फक्त पाच लोकांनीच नमाज पठण करावे जेणेकरून सामाजिक दुरी पाळता येईल,सर्दी खोकला,ताप,श्वास घेण्यास त्रास असल्यास आरोग्य विभागाच्या सर्व्हे करणाऱ्या चमुला कळवावे अशाप्रकारे जबाबदारी दिली गेली.
तसेच या दोन्ही नगरसेवकांनी देखील प्रशासनाला काही सूचना केल्या की रमजानचा पवित्र महिना असल्यामुळे दूध, फळ व भाजीपाला हे शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करावे व पवारपुरा ते इंदिरा नगर येथील नागरिकांचे १०० टक्के टेस्टिंग व्हावे तसेच टेस्टिंग ची रिपोर्ट नागपूर येथून उशिरा प्राप्त होत असल्यामुळे टेस्टिंग मशीन ची व्यवस्था यवतमाळात करावी. त्याचप्रमाणे जावेद परवेज अन्सारी यांच्यामार्फत २८ एप्रिल रोजी पवारपुरा ते इंदिरानगर येथील ५५० घरांना १५ दिवस पुरतील असे ५५० धान्य किट ज्यात १० किलो तांदूळ,तेल,साखर,पत्ती,तुरदाळ,नमक,हळद,मिर्ची, मसाले पुरविण्यात येईल व १५ दिवसा नंतर ५५० किट नगरसेवक प्रा. प्रवीण प्रजापती यांच्याद्वारे देण्यात येईल म्हणून या दोघांचा प्रशासनाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले. त्याचप्रमाणे नगरपालिका प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, उपविभागीय अधिकारी मॅडम व जिल्हाधिकारी एम.डी. सिंग हे प्रतिबंधित क्षेत्रात प्रशंसनीय कार्य करीत असल्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले यावेळी एस. पी.एम. राजकुमार एडिशनल एस.पी. नुरुल हसन नगरपालिकेचे मुख्याधिकारी व डी वाय एस पी मॅडम तसेच आरोग्य विभागाचे डॉक्टर्स हे सर्व उपस्थित होते.