Home विदर्भ अक्षयतृतीय च्या मुहूर्तावर ५० कुटूंबाना मायेचा हात तर १५०० पेक्षा जास्त लोकांना...

अक्षयतृतीय च्या मुहूर्तावर ५० कुटूंबाना मायेचा हात तर १५०० पेक्षा जास्त लोकांना मिळाला लाभ…

182

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – कोरोना विषानूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण देशात लॉक डोऊन गोष्टीत करण्यात आला.आता या लॉकडाउन ला जवळपास ऐक महिन्यापेक्षा जास्तचा कालावधी झालेले आहे.अश्यात सर्व काम धंदे बंद आहे.त्यामुळे जे लोक रोज मंजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात.अश्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे.म्हणून समाजात आपण वावरताना आपलं काही देणं लागत या भावनेतून अक्षयतृतीय ला प्रत्येक जर आपण आपल्या घरी मृत व्यक्तीला जेऊ खाऊ घालतो.पण या कोरोनाच्या महामारी मुळे अनेक गोर गरीब कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे.म्हणून अक्षय तृतीय च्या पूर्वसंधेला पवनार येथील अतिशय गरीब आणि होतकरू अश्या ५० कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूचा वाटप करण्यात आला.याआधी गेल्या महिन्याभाऱ्यापासून वर्धा सोशल फोरम व प्राचार्य दिनकरराव मेघे ट्रस्ट च्या माध्यमातून वर्धा शहरालगत असलेल्या सावंगी,वायफड,आकोली(हेटी),आंजी(मोठी),वायगाव,जुवाडी(सेलू),सेवाग्राम, तसेच शहरामध्ये असलेले आदिवासी कॉलनी,ईतवारी या परिसरातील सुमारे ३०० पेक्षा जास्त कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूचा वाटप करण्यात आला.या माध्यमातून आता परेन्त तब्बल १५०० पेक्षा जास्त लोकांना याचा फायदा झाला आहे.यावेळी वर्धा सोशल फोरम चे अध्यक्ष डॉ.अभियुदय मेघे म्हणाले की, मी व माझी पूर्ण टीम या पुढे देखील आम्ही आमचं काम असंच कोरोना हरवत पर्यत सुरू ठेवनार आहो.या किट दिलीप भाऊ कठाने,ब्रिजजी पांड्या,चंदू भाऊ राठी,अविनाश सातव,प्राचार्य दिनकरराव मेघे ट्रस्टच्या अध्यक्षा सविता मेघे,मनीषा मेघे,रवी मेघे,प्रकाश मेघे किरण मेघे यांच्या विशेष सहकार्याने तर सागर मेघे युवा मंच चे अध्यक्ष संदीप कुत्तरमारे, श्याम परसोडकर,मोहित सहारे,चेतन काळे,बंटी गोसावी,विशाल उराडे,अनिकेत भोयर,सुशांत वानखेडे,अमित वानखेडे यांच्या उपस्थितीत किराणा किट वाटप करण्यात आल्या.