Home मुंबई मुंबई पोलीस दलाला धक्का , आणखी एका कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यु

मुंबई पोलीस दलाला धक्का , आणखी एका कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यु

173

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

मुंबई – पोलीस दलातील एका ५३ वर्षीय हेड कॉन्स्टेबलचा आज करोनामुळं मृत्यू झाला आहे. त्याच्यावर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. मुंबई पोलीस दलातील हा दुसरा करोना बळी आहे.

पोलीस दलात करोनाचा संसर्ग वाढतच असून आज एका ५३ वर्षीय हेड कॉन्स्टेबलचा करोनामुळं मृत्यू झाला. करोनानं घेतलेला हा दुसरा बळी असून त्यामुळं मुंबई पोलीस दल हादरलं आहे. कालच वाकोला पोसीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका हेड कॉन्स्टेबलचा करोनामुळं मृत्यू झाला होता.

राज्यात करोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय! नवी मुंबईतील कामोठे येथे राहणाऱ्या या हेड कॉन्स्टेबलला कोविड विषाणूचा संसर्ग झाल्याचं निदान २३ एप्रिल रोजी झालं होतं. त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे पावणे पाचच्या सुमारास उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मुंबई पोलीस आयुक्तांनी ट्विटरच्या माध्यमातून या वृत्तास दुजोरा दिला आहे. पोलीस दल त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, असं ट्विट पोलीस आयुक्तांनी केलं आहे.

महाराष्ट्रात लॉकडाउनच्या काळात पोलीस दिवसरात्र डोळ्यांत तेल घालून पहारा देत आहेत. स्वत:च्या आरोग्याची पर्वा न करता पोलीस सेवा बजावत आहेत. त्यातच आता पोलिसांनाही करोनाने गाठले असून आतापर्यंत राज्यात ९६ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. त्यात १५ पोलिस अधिकारी आणि ८१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.