Home विदर्भ यवतमाळ शहरात आणखी 7 पॉझेटिव्ह

यवतमाळ शहरात आणखी 7 पॉझेटिव्ह

139
0

यवतमाळ – गत काही दिवसांपासून संस्थात्मक विलगीकरणात भरती असलेल्या सात जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्यामुळे आता पॉझेटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 13 वर पोहचली आहे. हे सातही जण पुर्वीच्या पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आले होते. तसेच यात काही जण त्यांच्या कुटुंबातीलसुध्दा आहेत. जिल्ह्यातील सहा प्रतिबंधित क्षेत्रापैकी एकाच भागातून हे पॉझेटिव्ह आढळत असल्याने या भागाच्या सीमाबंदीचा परीघ आता वाढविण्यात येणार आहे.

तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने संपूर्ण यवतमाळ शहर शनिवार, रविवार आणि सोमवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. जिल्ह्यात इतरत्र मात्र मर्यादीत वेळेनुसारच दुकाने सुरू राहतील, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.