Home मराठवाडा नांदेड शहरात आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण,६४ वर्षीय इसमावर उपचार सुरू,

नांदेड शहरात आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण,६४ वर्षीय इसमावर उपचार सुरू,

246

*राजेश भांगे*
नांदेड शहरात आढळला पहिला कोरोना
पॉझिटिव्ह रुग्ण, २० एप्रिल रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने झाला होता मेडिकल कॉलेजमध्ये भरती, ६४ वर्षीय इसमावर उपचार सुरू, रुग्ण नांदेडच्या भागातील रहिवाशी.

आजवर कोरोनामुक्त असलेल्या जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळला आहे. शहरातील नगर येथील एका ६४ वर्षीय पुरुषाची कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
शेजारील सर्व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडत असताना नांदेड जिल्ह्यात मात्र एकही रुग्ण सापडला नव्हता. मंगळवारी पाठवलेल्या ९ नमुन्यापैकी एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर यांनी दिली माहिती. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळीच सर्व यंत्रणेची तातडीची बैठक बोलाविण्यात आली असून तो रूग्ण राहत असलेला पिरबुरहान भागाचा आसपासचा पाच कि.मी.चा संपुर्ण परिसर सील करण्यात आले आहे. जतेने घाबरू जाता घरातच राहुन सहकार्य करावे असे जिल्हा प्रशासनाचे अवाहन. या सील केलेल्या भागात रूग्णाच्या संपर्कात आलेल्या संभवित संशयीतांच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथके आणि पोलिस तैनात करण्यात आली असुन. तरि जिल्हाधिकारी विपिन इटनकर व पोलिस अधिक्षक विजय कुमार मगर हे परिस्थितीवर लक्ष ठेवुन आहेत.