Home विदर्भ वर्दीतील वादळ Psi शिंदे

वर्दीतील वादळ Psi शिंदे

152

देवानंद जाधव

यवतमाळ – ग्रामीण पोलीस ठाण्या अंतर्गत कार्यरत पोलीस उपनिरिक्षक शिंदे साहेब ,परिसरात एक वर्दीतील तुफानी वादळ म्हणुन नावारुपाला आले आहे.

हातावर आणुन पानावर खाणार्या पंचक्रोशीतील अवघ्या माय मावल्यांना त्यांचा मोठा आधार वाटतोय मग गावा – गावात त्यांच्यावर होणारी पुष्पवृष्टी सारा आसमंत दरवळुन टाकत आहे , याचा दाखला सोबतची चिञफीत आहे, शिंदेंचे नाव घेताच अवैध धंदे करणार्यांचे पॅण्ट कमरेखाली घसरत आहेत , जो वर पडत नाही रट्टे,तो वर सुधरत नाही पोट्टे , हा विचार सर्वञ पेरला गेला आहे, स्वतःच्या घरादारावर तुळसी पञ ठेऊन, जनतेच्या संरक्षणासाठी दिवसरात्र जागता पहारा देणारा हा वर्दीतील देवमाणुस, ग्रामीण जनतेच्या गळ्यातील ताईत बनला आहे, अवैध धंदे करुन गोर गरीबांच्या संसारात माती कालवणार्या सैतानांबद्दल, त्यांच्या मनात असलेला प्रचंड राग त्यांच्या डोळ्यातुनच दिसतो, म्हणुनच अनेक सैतान ढुंगनाला आंबेहळद लाऊन घरीच ऊताने पडले आहेत , psi शिंदे आल्याची केवळ अफवा जरी पसरली तरी अवघ्या गावात सन्नाटा पसरतोय,जर शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर शपथपञ करुन, आयुष्य दान करता आलं असतं तर माझं ऊर्वरित संपुर्ण आयुष्य मी त्यांना दान केलं असतं, पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची शिदोरी आणि अनुभवाचे तहान लाडु, भुकलाडु संगती घेऊन ते तुमच्या आमच्या नि देशसेवेसाठी निघाले आहेत, त्यांची काही इंद्रधनुष्यी स्वप्ने आहेत , त्यांच्या या स्वप्नांना बिल्लोरी आशेची किनार आहे, त्या स्वप्नांना आकार येऊन ती साकार होवो, हिच विधात्या चरणी प्रार्थना करतो,आणि भावी जीवनातील आरोग्य आणि सुख संपदे साठी कोटी कोटी शुभेच्छा देतोय…!