August 5, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

खाऊच्या पैस्यातुन “चिऊ” ची प्याऊ…!

देवानंद जाधव

यवतमाळ – अवघा देश कुलूपबंद आहे, सर्वञ सन्नाटा पसरला आहे. मनुष्य प्राण्यासह, सृष्टीतील तमाम चिमण्या पाखरांची भाकरी साठी वणवण भटकंती सुरु आहे, आभाळभर मोकळा श्वास घेणारा,माञ तहानेने व्याकुळ झालेल्या चिमण्यांचा चिवचिवाट मानवी मन बधीर करणारा आहे. दाणापाण्या वाचुन पक्षांची होणारी फडफड माणसाचं काळीज घायाळ करणारी आहे. हि चिमण्या पाखरांची तगमग यवतमाळ तालुक्यातील मांगुळ (तरोडा)येथील,जणु दुधाचे ओठही न सुकलेल्या चिमुरड्यांच्या मेंदुवर कळत नकळत कोरल्या गेली.महीना भरा पासुन बाजार नाही, त्यामुळे “भातकं”खाण्याचा विषय नाही. मायबापांनी वेळोवेळी दिलेल्या पाच दहा रुपयांची पदरमोडही केली नाही, त्याच खाऊच्या पैस्यातुन चिऊ ची प्याऊ,उभारण्यासाठी या चिमुरड्यांची पावलं कुंभाराच्या घराकडे मातीची भांडी घेण्यासाठी सरसावले, आप आपल्या मुठीत पैसे आवळत विष्णु बाबाराव चौकंठे या कुंभाराला चिमुरड्यांनी चिऊच्या प्याऊ ची कल्पना सांगताच त्यांचेही डोळे डबडबुन आले.

क्षणाचाही विलंब न करता विष्णू ने अर्धा डझनावर मातीची भांडी कोणताही मेहनत आणा न घेता दिली, त्याच पैस्यातुन मग या मुलांनी तांदुळ आनुण चिमण्या पाखरांची भुकेची आग शमवली, चिऊंची राहुटी असलेल्या ठिकाणी दाणा पाण्याची सोय केली. जेव्हा जेव्हा चिमण्या पाणी प्यायला येतात तेव्हा तेव्हा या चिमुरड्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो, संपुर्ण मानव जातीला, बिंदू तुन सिंधु चा स॔देश देणार्या सोनपाखरां मध्ये, अंकुर जाधव, अजय सुर्यवंशी, नम्रता डोंगरवार, धनश्री पवार, रागीणि जाधव, ओम जोगे, जय चव्हाण, पवन डोंगरवार, करण जाधव, चिंटु राठोड आदींचा सहयोग आहे. या उपक्रमांची गावभर तोंड भरुन स्तुती केली जात आहे. भावी जीवनातील आरोग्य आणि सुख संपदे साठी या तमाम चिमुरड्यांना आभाळभर शुभेच्छा…!

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!