Home विदर्भ आरोग्य कर्मींच्या सुरक्षिततेसाठी स्वाब कलेक्शन बूथ…!

आरोग्य कर्मींच्या सुरक्षिततेसाठी स्वाब कलेक्शन बूथ…!

58
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

रोटरी क्लब ऑफ गांधी सिटीचा पुढाकार

डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा संसर्गाचा धोका कमी करण्याचा उद्देश.

वर्धा, दि. १९ :- जगात कोरोनाच्या पार्श्व भूमीवर अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग होत आहेत. हॅन्ड वॉश स्टेशन, सॅनिटायझर व्हॅन अशा नाविन्यपूर्ण संकल्पना समोर येत असताना आरोग्य कर्मचाऱ्यांचा धोका रोटरी क्लबने स्वाब कलेक्शन बूथ तयार करून कमी केली आहे. असे बूथ जिल्ह्यातील कोविड रुग्णालय असणारे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे लावण्यात आले आहे.
सर्वत्र कोरोनाचे थैमान सुरू असताना वर्धा जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यात प्रशासनासोबतच जिल्ह्यातील सामाजिक संस्था, कार्यकर्ते आणि नागरिकांचे सहकार्य महत्वाचे ठरत आहे. कोरोनाचा सर्वात जास्त धोका रुग्णाच्या निकट संपर्कात येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याना आहे. यातील पहिली पायरी, एखादा संशयित कोरोना बाधित आहे की नाही याची चाचणी घेण्याची असते.
या पहिल्या पायरीवरच काळजी घेतली गेली तर पुढील धोका कमी होऊ शकतो. चाचणीसाठी संशयित रुग्णाच्या घशातील व नाकातील स्त्राव हात तोंडात घालून डॉक्टरांना काढावा लागतो. स्त्राव घेणारा कर्मचारी हा संशयित रुग्णाच्या सर्वात जास्त जवळ जातो. त्यामुळे या आरोग्य कर्मचाऱ्यांला सुरक्षितपणे स्त्राव घेता यावा यासाठी रोटरी आणि डी एस फर्निचर यांनी स्वाब कलेक्शन बूथ तयार केला आहे.यामुळे पी पी ई पोशाख घालण्याची सुद्धा आवश्यकता लागत नाही. यामध्ये आरोग्य कर्मचारी हा बुथच्या आत राहतो. संशयित व्यक्ती त्या बूथ समोर येऊन उभी राहिल्यावर बूथला लागलेले हात मोजे घालून डॉक्टर केवळ हाताने रुग्णाच्या घशातील व नाकातील स्त्राव घेतो. संशयित व्यक्ती आणि डॉक्टर यांच्यामध्ये काच लागलेली असल्याने स्त्राव घेताना रुग्णाच्या तोंडाशी किंवा शरीराशी डॉक्टरांचा थेट संपर्क येत नाही आणि कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका या पहिल्या पायरीवरच थांबवता येतो.
हे टेस्टिंग बूथ बनविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे यांनी रोटरीला सांगितल्यावर त्यांनी लगेच होकार दिला. सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाययक अभियंता आणि रोटरीचे माजी प्रांत पाल महेश मोकलकर यांनी यासाठी अतिशय परिश्रम घेतले. या लॉकडाऊनच्या काळात साहित्य मिळवण्यासाठी त्रास झाला. पण ज्या दुकानदाराकडे गेलो त्यांनी कोणतेही पैसे न घेता यासाठी लागणारे साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले. डी एस फर्निशर यांनी माझ्यासोबत रात्रंदिवस काम करून 48 तासात दोन बूथ तयार करून दिले. आपल्या कोरोना योद्धांसाठी आपलेही काही देणे आहे या माणुसकीच्या जाणिवेने सर्वांनी यासाठी सहकार्य केले असे महेश मोकलकर यांनी सांगितले. यासाठी रोटरी क्लब गांधी सिटी चे अध्यक्ष पंकज शर्मा , मनीष सराफ, आसिफ झाईद, मनोज जुमडे, पिंकी उमरे, मूर्तुझा हुसेन, काईत इसाजी यांचा महत्वाचा सहभाग होता.
या बूथमुळे आरोग्य कर्मिना भरपूर सुरक्षितता मिळेल आणि त्यांच्या मनातील भीती कमी होईल. यासोबतच लोकांच्या मनातील स्वाब कसे घेतात याचे गैरसमज दूर होतील . जगात अशा पद्धतीच्या बुथचा वापर काही देशांनी केला आहे. आपल्या देशातही पोंडीचेरी कोईम्बतुर मध्ये असे बूथ लावण्यात आले आहेत. या बुथमुळे स्त्राव घेण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ आणि सोपी झाली आहे. तसेच हे बूथ बाहेरच लावले असल्यामुळे एखादा संशयित रुग्णाचा रुग्णालयातील इतर रुग्णाशी संपर्क येण्याचीही शक्यता राहत नाही. असे मत कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. एस. पी.कलंत्री यांनी व्यक्त केले.
आज सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालयात स्वाब कलेक्शन बुथचे लोकार्पण जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी सचिन ओम्बासे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, डॉ. गर्ग यांची उपस्थिती होती.

Previous articleComplain If Schools Ask For Fees During Lockdown – Minister Varsha Gaikwad
Next articleखाऊच्या पैस्यातुन “चिऊ” ची प्याऊ…!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.