Home मराठवाडा राज्यात सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना कोविड-१९ तपासणी केंद्रांची मान्यता – नांदेडच्या शासकीय...

राज्यात सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना कोविड-१९ तपासणी केंद्रांची मान्यता – नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा हि समावेश

130
0

नांदेड, दि.१९ ( राजेश भांगे ) – कोविड-१९ चा वाढता प्रसार लक्षात घेता स्थानिक पातळीवर चाचणी होण्याच्या दृष्टीने राज्यातील शासकीय, खाजगी त्याचप्रमाणे अभिमत विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोविड-१९ तपासणी केंद्र स्थापन करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी घेतला होता. यामध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेडचा समावेश आहे.

त्यानुसार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी त्यांचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याबाबत सुचित करण्यात आले होते. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात अशी तपासणी केंद्र उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून याचाच एक भाग म्हणून राज्यातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड-१९ चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या चाचणी केंद्रासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री, साधन सामग्री तसेच अन्य बाबी संबधित जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित करण्यात आलेल्या समितीच्या मान्यतेने व शिफारशीनुसार करण्यात याव्यात असे आदेशही देण्यात आले आहेत.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबाजोगाई जि. बीड; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव; राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती जि. पुणे या महाविद्यालयांचा यात समावेश आहे.

या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड-१९ तपासणी केंद्र स्थापित करण्याच्या दृष्टीने विहित करण्यात आलेली मानके, कार्यपद्धती आणि अन्य बाबीची पूर्तता करण्याची जबाबदारी महाविद्यालयाच्या प्रमुखावर टाकण्यात आली आहे. बाधित रुग्णांची तपासणी स्थानिक स्तरावर करणे आणि अशा रुग्णावर तातडीने उपचार सुरू करणे शक्य होणार असल्याने या तपासणी केंद्रांची निर्मिती लवकरात लवकर करण्यात यावी असे निर्देशही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.

Previous articleशिरवळवाडी ग्रामस्थ व शेतक-याकडून मदतीचे ओघ.
Next articleComplain If Schools Ask For Fees During Lockdown – Minister Varsha Gaikwad
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.