Home सोलापुर शिरवळवाडी ग्रामस्थ व शेतक-याकडून मदतीचे ओघ.

शिरवळवाडी ग्रामस्थ व शेतक-याकडून मदतीचे ओघ.

226

वागदरी / नागप्पा आष्टगी

अक्कलकोट – कोरोना विषाणू मुळे जनजीवन टप्प आहे. गरीब व गरजु नागरिकांना धान्याची कमतरता भासु नये म्हणुन अक्कलकोट तहसिलदार अंजली मरोड यांनी मदतीचे आवाहन केले होत.

हाकेला साद देते शिरवळवाडी येथील नागरिक व शतक-यांनी मदतीचे हात पुढे केले आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिक आपण देशाचे व समाजाचे काहीतरी देणे लागतो यानुसार शेतकरी स्वच्छेने ज्वारी, गहू, तांदूळ दान दिले अदांजे आतापर्यंत 20 क्विंटल धान्य जमा असून अजून हि नागरिक मदत देत आहेत.
शिरवळवाडी ग्रामसेविका शैलजा पोमाजी यानी सर्व धान्ये जमा करुन अक्कलकोट तहसिलदार कार्यालयात जमा करणार आहेत.त्या नंतर गरजूना अन्न धान्य वापट करण्यात येणार आहे तसेच याकामासाठी ग्रामसेविका, सरपंच,पोलीस पाटील,ग्रामपंचायत कर्मचारी,अंगणवाडी सेविका, कोतवाल मिळून काम करत आहेत.अशी माहिती ग्रामसेविका शैलजा पोमाजी यानी सांगितले