Home मराठवाडा विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू…!

विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू…!

21
0

मजहर शेख

किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथील दुर्दैवी घटना

नांदेड / किनवट , दि. १८ :- किनवट तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीतील दहेली तांडा येथील उस्मान दिवानजी यांच्या शेतात पाणी पिण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाय घसरून विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना आज दिनांक अठरा रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास देहली तांडा येथे घडली.

दहेली तांडा येथील शुभम गणेश पवार (२०) व नाशिर खान नुरखान पठाण(२०) हे दोघे उस्मान दिवानजी यांच्या शेतातील विहीरीत पाणी पिण्या साठी गेले असता पाय घासरून विहिरीत पडल्याने या दोघा ही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला.या दोघांवर ही देहली तांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.संदीप जाधव,डॉ. दिलीप मंडलवार यांनी शवविच्छेदन केले.पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण,सपोउ पठाण, पोहेकॉ भारत राठोड, दारासिंग चव्हाण, घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.या घटने ने सर्वत्र हळ हळ व्यक्त करण्यात येत आहे.

Unlimited Reseller Hosting