Home जळगाव निर्मल सिडस्‌ पाचोरा कंपनीकडून कोविड -19 कोरोना विषाणू नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात मास्क,...

निर्मल सिडस्‌ पाचोरा कंपनीकडून कोविड -19 कोरोना विषाणू नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात मास्क, हॅन्ड सॅनिटायझर्स व हॅन्ड ग्लोज साहित्याचे वाटप

355

निखिल मोर – पाचोरा

करोना विषाणूची भिषणता दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. करोनामुळे जग धास्तावलेले असून अवघा देश संकटात आहे. सबंध देशात अतिशय संवेदनशील वातावरण आहे. करोना विषाणुचा इतरांच्या संपर्कातून होणारा संसर्ग टाळणे ही काळाची गरज बनली आहे. करोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे आणि विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना राबविणे अतिशय आवश्यक झाले आहे.
या संकटावर मात करण्यासाठी, विजय मिळविण्यासाठी युध्दपातळीवर शासन-प्रशासन, सरकारी कार्यालये, रुग्णालये, आरोग्य केंद्रे, पोलिस स्टेशन, नगरपालिका व इतर महत्वाची आस्थापने यातील सर्व अधिकारी, कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा बजावत आहेत. संकटाशी मुकाबला करताना दिसत आहेत. अशा सर्व जिगरबाज सेवाभावी अधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्मल सिडस् कंपनीकडून त्यांच्या कार्याला सलाम ! आणि वरिल सर्व कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून निर्मल सिडस्‌ कंपनीने *नोज माक्स (20,000 नग), हँड सॅनिटायझर्स (250 बॉटल्स्‌) आणि हँड ग्लोज (10,000 नग)* असे निर्जंतुकीकरणासाठीचे साहित्य उपलब्ध करुन खालील प्रमाणे वितरीत केले असुन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपुर्त करण्यात आले आहे. पाचोरा मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र (7 विभाग) उपविभागीय कार्यालय, तहसिल कार्यालय, पोलिस स्टेशन, नगरपरिषद त्याचबरोबर भडगाव मध्ये तहसिल कार्यालय, पोलिस स्टेशन व नगरपरिषद या सर्व कार्यालयांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे सर्व साहित्य काल दि. १६/४/२०२० रोजी सुपुर्त केले आहे.

कार्पोरेट क्षेत्रात सामाजिक जाणीव असलेल्या निर्मल सिडस्‌ कंपनीने शेतकरी असो की नागरिक असोत, समुदायाच्या प्रबोधन व विकासाच्या दिशेने आतापर्यंत लक्षणीय योगदान दिलेले आहे. आज सुध्दा सामाजिक उत्तरदायित्वाच्या जाणिवेतून आणि भूमिकेतून या गंभीर साथरोगाची प्राधान्याने दखल घेऊन व पुढाकार घेत वरील सर्व कर्मचाऱ्यांसाठी निर्जंतुकीकरणासाठीचे साहित्य उपलब्ध करुन दिलेले असुन ते सर्व साहित्य वरील प्रमाणे सर्व संबधीत अधिकाऱ्यांकडे सुपुर्त केलेले आहे.

या विषाणुचा इतरांच्या संपर्कातुन होणारा संसर्ग टाळणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वाधिक दक्षतेचा भाग असल्यामुळे सर्वांनी घरीच राहावे. स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, अनावश्यक कुठेही फिरु नये, शासन -प्रशासनाला पुर्णपणे सहकार्य करावे असे आवाहान आम्ही निर्मल सिडस् च्या वतीने करीत आहोत.