Home जळगाव गो. से. हायस्कुलचे शिक्षक घेत आहेत व्हाट्स अॅप गृपद्वारे विद्यार्थ्यांचा आॅनलाईन अभ्यास

गो. से. हायस्कुलचे शिक्षक घेत आहेत व्हाट्स अॅप गृपद्वारे विद्यार्थ्यांचा आॅनलाईन अभ्यास

684

पाचोरा ✒️ निखिल मोर

जळगाव – श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथील शिक्षक बंधु भगिनींनी फोनद्वारे विद्यार्थ्यांच्या पालकांना संपर्क करून कोरोना संदर्भात माहिती घेऊन, पालकांना व विद्यार्थ्यांना घरीच थांबावे असे सांगून सतर्क राहण्याबद्दल सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा त्यांच्या वर्गानुसार वर्ग शिक्षक व शिक्षिकांनी आप – आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करून ऑनलाइन अभ्यास घेत आहे. जेणे करून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. व विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर कुठलाही परिणाम होणार नाही. ही संकल्पना जोपासत शिक्षकांनी हा उपाय शोधुन काढला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना फायदा होत असुन या सर्व शिक्षक – शिक्षिकांचे पाचोरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, व्हाइस चेअरमन विलास जोशी, सचिव महेश देशमुख, शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन, मुख्याध्यापक एस. डी. पाटील, उपमुख्याध्यापक प्रमिला वाघ, पर्यवेक्षिका प्रमिला पाटील, पर्यवेक्षक आर. एल. पाटील यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.