Home महत्वाची बातमी वाढवलेल्या ‘लॉकडाऊन’चा शेतीमालाला मोठा फटका.

वाढवलेल्या ‘लॉकडाऊन’चा शेतीमालाला मोठा फटका.

74
0

आर्वी त‍ालुका येथील शेतकर्याचे लाखो रुपयाचे नुकसान…

वर्धा जिल्हा आर्वी तालुका येथील शेतकरी बाळा जगताप हा मोठ्य‍ संकटात सापडला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्यापही कमी होत नसल्याने वाढवलेल्या ‘लॉकडाऊन’चा शेतीमालाला मोठा फटका बसत आहे. एकीकडे कोरोनाची धास्ती आणि दुसरीकडे लाखो रुपये खर्च करून जगवलेली केळी डोळ्यांदेखत फेकून देण्याच्या स्थितीत आल्याने केळी उत्पादकही अक्षरशः हतबल झाले आहेत.

सध्या बाजारात मागणीच नसल्याने १५० रुपये क्विंटल म्हणजे दिड रुपये किलो दराने केळी विकावी लागत आहे. काळजावर दगड ठेवून शेतकरी कवडीमोल भावात केळी विकण्यासाठी धडपड करीत आहेत. आतापर्यंत झालेला लाखो रूपयांचा खर्चही निघणे दुरापास्त झाला आहे. एकूणच कोरानमुळे बहुतांश शेतकऱ्यांचे जीवनच अंधकारमय झाले आहे.

मागील वर्षी दुष्क‍ाड असल्यावरहि ९ एकरा मध्ये १३ हजार ५०० केळीच्या झाडाचि लागवड केली होती. १५ रुपये दराने केळीचे रोप विकत आणले. १३ हजार ५०० हजार केळीचे रोपे लावायचे म्हटले तरी त्याला रोपांसाठी निव्वळ २ लाख २५ हजारांचा खर्च आला.

पुन्हा केळी वर्षभरात रासायनिक खतांचे तीन डोस दिले. याशिवाय निंदणी, वखरणी असा एकूण १० लाखांपर्यंत जवळ पास खर्च बागेला अला अाहे. आता हिच केळी कापणीला आली असून केळीला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, कोरोनाच्या रूपाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. २५ दिवसांपासून सुरु असलेले लॉकडाऊन आणखीन वाढवण्यात आल्याने त्याचा फटका शेतीमालाला बसला आहे. त्यात बाळा जगताप यांचे एकुन १७ ते १८ लाख रुपयांचे नुकसानाचे अंदाज आहे.

केळी उत्पादकांना दिलासा द्यावा…

लॉकडाऊनच्या काळात जिल्हा प्रशासनाने ज्या प्रकारे धान्य बाजारात खरेदी- विक्रीला मुभा दिली आहे, त्याच धर्तीवर केळी विक्रीसह वाहतुकीला देखील परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. उत्पादीत झालेली केळी वेळेत विकली गेली तरच शेतकऱ्यांचे कर्ज फिटणार आहे.
आता पुन्हा डोळ्यांदेखत केळीचे नुकसान होण्याची भीती त्यांना सतावत आहे. तालुका प्रशासनाने याबाबत समन्वयाने तोडगा काढून केळी उत्पादकांना केळी विकण्याचे परवाने द्यावेत, अशी मागणी होत आहे.

शेतकरी बनला हतबल…

येथील शेतकरी बाळा जगताप यांनी त्यांच्या शेतात केळीच्या १३ हजार ५०० रोपांची लागवड केली होती. आज त्यांचा माल कापणीसाठी तयार असून व्यापारी केळी घेण्यासाठी धजावत नाहीत. त्यामुळे आतापर्यंत झालेला लाखोंचा खर्च वाया जाणार असल्याचे दिसत आहे. शेतात केळी कापणीला आलेली असून ती जास्त दिवस ठेवता येणार नाही. तयार झाल्यावर लगेचच विकावी लागते. आता ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढल्याने हातातोंडाशी आलेला घासच जणू हिरावला जाणार असल्याची भीती निर्माण झाली आहे. सरकारने केळी उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा समजून त्यांना न्याय द्यावा. होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी बाळा जगताप यांनी केली.

बाळा जगताप (शेतकरी)

प्रतिनिधि
रविन्द्र साखरे सह ईकबाल शेख