Home मराठवाडा नांदेड जिल्ह्यातील पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास गय केली जाणार नाही...

नांदेड जिल्ह्यातील पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास गय केली जाणार नाही – पोलीस अधिक्षक विजयकमार मगर

97
0

नांदेड, दि. १७ ( राजेश भांगे ) – कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केलेली आहे. तरी नांदेड जिल्हयात सद्या एकही कोरोना विषाणुंने संक्रमीत रुग्ण आढळून आलेला नाही, लॉकडाऊन व संचार बंदीच्या कालावधीत आरोग्य विभागाचे कर्मचारी हे बाहेर जिल्ह्यातून आलेल्या लोकांना घरोघरी जावून कोरोना विषाणुंच्या संक्रमणा बाबत तपासणी करत आहेत .

नांदेड शहरातील धनेगांव येथे पुणे येथून काही लोक आले असल्याची माहिती मिळाल्याने आरोग्य विभागाचे कर्मचारी हे त्यांची तपासणी करण्यासाठी गेले असता त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे , सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री विजयकुमार मगर यांनी नांदेड जिल्ह्यातील जनतेने पोलीस व आरोग्य विभागातील कर्मचारी यांच्यावर हल्ले केल्यास त्यांची गय केली जाणार नाही. त्यांचेवर गंभीर गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाही करण्यात येईल असा इशारा दिला आहे.