Home महत्वाची बातमी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १० कोटी

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १० कोटी

20
0

विशेष प्रतिनिधी राजेश भांगे

मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत आहे. या जागतिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले योगदान म्हणून सर्व विद्यापीठांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करावी असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले होते.

याला सकारात्मक प्रतिसाद देत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून १० कोटी रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९’साठी देण्याचे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

*तसेच उर्वरित विद्यापीठांकडून देखील ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९’ साठी मदत म्हणून निधी जाहीर केली जाईल असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.*

Unlimited Reseller Hosting