Home मराठवाडा देगलूर न.पा. प्रशासना कडून सलग तिस-या दिवशीही धडक कारवाई – ७४ जणांकडून...

देगलूर न.पा. प्रशासना कडून सलग तिस-या दिवशीही धडक कारवाई – ७४ जणांकडून १३००० दंड वसूल

71
0

नांदेड, दि. १७ ( राजेश भांगे ) – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने सलग तिस-या दिवशी धडक कारवाईची मोहिम राबवून मास्क न लावणे, विनाकारण घराबाहेर पडणे, रस्त्यावर थुंकणे व जीवनावश्यक नसलेली वस्तुची दुकाने सुरु करणे या कारणास्तव सलग तिस-या दिवशीही २१ जणां विरुध्दा दंडात्मक कार्यवाही करुन त्यांच्या कडून ३३०० रुपये दंड वसूल करण्यात आले आहे.
तरी अत्ता पर्यंत केलेली कारवाही म्हणजे दि.१५ एप्रिल रोजी २८ जणां कडून ५५०० रुपये, दि.१६ एप्रिल रोजी २५ जणां कडून ४२०० रुपये, असे एकूण ७४ जणां कडून १३००० रुपये दंड वसूल करण्यात आले आहे.
व या पुढेही ही कार्यवाही सतत चालू राहील असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. या मोहिमेत उपजिल्हाधीकारी शक्ती कदम, तहसिलदार अरविंद बोळंगे, पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, मुख्याधिकारी गंगाधर इरलोड, स.पो.निरीक्षक संगमनाथ परगेवार, स.पो.निरीक्षक जॅकी कोरे, स्वच्छता निरीक्षक एम.गायकवाड, कर्मचारी मार्तंड वनंजे, संघरत्न ढवळे, रवि कांबळे, सिद्धार्थ वाघमारे, लक्ष्मण कांबळे, तुकाराम पाडदे व इतर नगरपरिषद कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांनी कार्यवाहीत सहभाग घेतला.