Home सातारा ‘ती’पॉकेट मनीचा वापर करतेय सामजिक बांधिलकी साठी…

‘ती’पॉकेट मनीचा वापर करतेय सामजिक बांधिलकी साठी…

154

वडूज च्या अर्चना पवारचे कौतूकास्पद कार्य

सतीश डोंगरे

मायणी , ता.खटाव. जि.सातारा – युवा पिढीला खर्च करायला पॉकेट मनी मिळतो तो शक्यतो घरातूनच.मात्र त्या पॉकेट मनीचा वापर कशासाठी होतो हे मात्र काहीवेळा कुटूंबाला सुद्धा माहीत नसतो. मात्र याला अपवाद ठरतेय ती उंबर्डे ता.खटाव येथील अर्चना बाबुराव पवार ही अभियांत्रिकी विद्यालयात शिक्षण घेत असलेली विद्यार्थीनी…. तिने चक्क घरातून
मिळालेला पॉकेट मनीचा खर्च हा कोरोनाशी लढणाऱ्या हातांसाठी केला आहे. शहरात तसेच परिसरात काम करणाऱ्या पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तिने स्वखर्चातून
सॅनेटायझरवाटप केलं आहे… याबाबत तिला कुटुंबाकडून
सुद्धा चांगले सहकार्य मिळत असल्याचे तिने सांगितले. सध्या जगभरासह महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचे चित्र आहे. आणि लोकांना सुद्धा शासन, प्रशासनाकडून खबरदारी घेण्यासाठी नेहमीच
सांगितले जातेय. मात्र अत्यावश्यक सेवेत काम
करणाऱ्यांचे नेहमीच लोकांच्यात संपर्क राहत आहे. अशा
सेवेत काम करणाऱ्या लोकांचे सुद्धा आरोग्य चांगले राहावे,
सुरक्षित राहावे यासाठी ही अर्चना पवार धडपडतेय.
आज अर्चना हिने शहरातील पोलीस कर्मचारी,
पट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारांना तिने सॅनेटायझर, बिस्कीट पुडे वाटले. स्वतः एकटी गाडी घेऊन शहरात ती अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या सर्वांना वाटत होती. यावेळी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव पाहिला मिळत होता. आणि यावेळी उपस्थित लोक सुद्धा तिच्या कार्याबद्दल तिचे मन भरून कौतुक करीत होते.
अर्चना ही गेल्या १५ दिवसापासून हे कार्य
करीत आहे. ती नाशिक येथे इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या
वर्षात शिकत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ती आपल्या गावी आहे. उंबर्डे येथील ठेकेदार बाबुराव पवार यांची ती मुलगी आहे. या अगोदर तिने पूरग्रस्तांना मदत सुद्धा केली आहे.