Home मराठवाडा पोस्टमन नी बँकेतील पैसे शेतात जाऊन दिले AEPS द्वारे केले वाटप

पोस्टमन नी बँकेतील पैसे शेतात जाऊन दिले AEPS द्वारे केले वाटप

146

नांदेड / इस्लापुर – दि.१६ कोरोनाच्या महामारीत संपूर्ण जगावर संकट आले आहे.
शासन आपापल्या परीने जनतेची पोलीस, डॉक्टर,पत्रकार, नर्स,सफाई कामगार, याचं सेवा करीत आहे.याचं माळीतील मनी प्रमाणे भारतीय डाक विभाग नांदेड डाक टीम संपूर्ण देशात नागरिकांनी बँकेत व पोस्ट ऑफिस मध्ये गर्दी होऊ नये.
प्रत्येक नागरिकांना घरपोच मिळावा यासाठी नांदेडचे डाक अधीक्षक शिवशंकर बी लिंगायत यांनी रात्रंदिवस नांदेड जिल्ह्यातील वाड्या तांड्यात व आदिवासी भागात विशेष यंत्रणा राबून लक्ष ठेऊन आहेत.
किनवट तालुक्यातील भिशी या गावचे तरुण पोस्टमन ज्ञानेशवर नूनेवार यांनी दररोज सकाळी आपल्या पोस्ट ऑफिस च्या क्षेत्रातील जनतेला तुम्ही घरांतच बसा..बाहेर कोणीही येऊ नका.प्रशासनास मदत करा.मी आपल्या कोणत्याही बॅंकेतील पैसे,जनधन खात्याचे पैसे,निराधाराचे पैसे,बचत खात्यातील पैसे घरपोच पोस्ट बँकांच्या बायोमेट्रिक द्वारे पैसे देतो काळजी करू नका असे गावात जनतेला जनजागृती करीत असतो.
आज पोस्टमन यांनी गावात जनधनचे वाटप केले.काही गावातील गोरगरीब शेताचे कामे करण्यासाठी मोलमजुरी करण्यासाठी शेताला गेले.
त्यातील एका महिलेचा फोन पोस्टमन ला साहेब मी शेतात कामाला आहे मी येतो तुम्ही जाऊ नका असे म्हणाली.पोस्टमन यांनी म्हणाले बाई तुम्ही मजुरीचे काम सोडून येऊ नका तुम्ही कोणाच्या शेतात आहे ते सांगा मीचं शेतात येऊन पैसे देतो.
पोस्टमन नी जवळच असलेल्या शेता जाऊन काही महिलांना त्याचे मोबाईल क्रमांक व आधार कार्ड पोस्ट बॅंकेचा मोबाईल ला जोडला तोच एक संदेश नंबर ग्राहकाच्या मोबाईल गेला.
ग्राहकांचा बायोमेट्रिक वर आंगठा घेतला व बँकेच्या खात्यातील पैसे त्याच्या मागणी प्रमाणे काडून दिले. या पोस्ट बँक व पोस्टमन च्या सेवेबद्दल नांदेड जिल्ह्यातील नागरिकाना मोठा दिलासा मिळाला आहे.
अशी चर्चा ग्रामीण भागातून नागरिकांतून होत आहे.
________________________________
पोस्टमन नी उत्कृष्ट सेवा नागरिका देत असल्याने डाक निरीक्षक किनवट यांनी फोन वरून पोस्टमनचे अभिनंदन केले..
________________________________