Home जळगाव सावदा येथे पालिके तर्फे मास्कसक्ती संदर्भात नागरिकांना आवाहन । नागरिकांनी मास्क सक्तीने...

सावदा येथे पालिके तर्फे मास्कसक्ती संदर्भात नागरिकांना आवाहन । नागरिकांनी मास्क सक्तीने वापरा – मुख्याधिकारी सौरभ जोशी

138

प्रदीप कुलकर्णी

सावदा – देशभरात कोरोना निवारणा साठी लॉकडाउन सुरु असून विविध उपाययोजना सुरु असून सावदा शहरात देखील पालिकेचे तर्फे उपाययोजना राबविन्यात येत आहे, दररोज याबाबत पालिका नवनवीन उपाय अमलात आणत आहे नागरिकांनी सोशल डिस्टिंग पाळावे, वेळोवेळी हात धुवावे यासाठी जनजागृति सुरु आहे, नागरिकांनी ठराविक वेळेस हात धुवावे म्हणून भोंगा वाजुन नागरिकांना हात धुण्या बाबत सूचना देण्यात येत आहे, शहरात विविध ठिकाणी औषधे फवारणी सुरु आहे, काही उर्वरित भागात ती करण्यात येणार आहे .
दरम्यान अत्यावश्यक कामासाठी जे नागरीक घराबाहेर पड़त आहे त्यांनी मास्क वापरणे सक्तीचे असून मास्क न वापरणाऱ्या व्यक्तिस जागेवरच 500 रु दण्डाची घोषणा फैजपुर प्रांतअधिकारी अजित थोरबोले यांनी केले असून याच बाबत आज दी 12 रोजी सावदा पालिकेचे तर्फे सावदा शहरात रिक्षा फिरउन त्या द्वारे नागरिकांना सूचना देण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी बोलताना सांगितले यामुळे आता सावदा शहरात विनामास्क रस्त्यावर फिरताना दिसल्यास अश्या नागरिकांना दंड होणार आहे, पालिका शहरात कोरोना संदर्भात उपाययोजना राबविताना दिसत आहे.