Home महत्वाची बातमी सोशल डिस्टनसिंग आणि बहुजनांवर लादलेले लॉकडाऊन कायमचे तोडणारे महामानव डॉ भीमराव आंबेडकर...

सोशल डिस्टनसिंग आणि बहुजनांवर लादलेले लॉकडाऊन कायमचे तोडणारे महामानव डॉ भीमराव आंबेडकर होते:- आदील पठाण

141
0

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त केले प्रतिपादन….

रवी अण्णा जाधव

देऊळगाव मही(प्रतिनिधी :- देऊळगाव राजा तालुक्यातील मंडपगाव येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करत अभिवादन करण्यात आले.
या लोकडाऊन च्या काळात कायदा सुव्यवस्थेचे पालन करत छोट्या खाणी पुष्प अर्पण करत जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी बोलताना सोशल डिस्टनसिंग आणि बहुजनांवर लादलेले लोकडाऊन कायमचे तोडणारे महामानव डॉ भीमराव आंबेडकर होते असे प्रतिपादन कार्यक्रमाला उपस्तीत समाजीक कर्ते संपादक आदील पठाण यांनी केले.
पुढे बोलतांना पठाण म्हणाले जगातला असा एकमेव विद्यार्थी ज्याचा शाळेतील पहिला दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरी करतात आणि एकमेव असा महापुरुष ज्याने पुस्तकांसाठी घर बांधले पुस्तकप्रेमी,अद्वितीय असे महामानव डॉ भीमराव आंबेडकर आहे.
त्यामुळे त्याचा आदर्श घेऊन सर्वांनी वाचन संस्कृती इथून पुढे जोपासावी असे सांगितले.
यानिमित्त मंडपगाव मा उपसरपंच राजू पठाण,आत्माराम काकडे, लहुजी काकडे, शेख असद, शेख मोसीन,शेख सादिक व इतर गावकरी उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting