Home सोलापुर कोरोनाचे संकट , हॅलो मेडिकलने दिला दोनशे विधवा महिलांना आधार…!

कोरोनाचे संकट , हॅलो मेडिकलने दिला दोनशे विधवा महिलांना आधार…!

147

सतीश मनगुळे

अक्कलकोट – नेहमी संकटाच्या काळात अणदूर येथील हॅलो मेडिकल फाउंडेशन हे मदतीसाठी पुढे येत असते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील त्यांनी विधवा आणि निराधार महिलांसाठी मदतीचा हात
पुढे केला आहे.यामुळे
त्यांना मोठा आधार मिळाला आहे.लोहारा,तुळजापूर
आणि अक्कलकोट या तीन तालुक्यांमध्ये दोनशे महिलांना साधारण एक महिन्याचे पुरेल एवढे किराणा बाजार देऊन त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.संस्थेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत अहंकारी व शुभांगी अहंकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचे कार्य सुरू आहे.हॅलो मेडिकल फाऊंडेशन ही संस्था आरोग्य विषयक जनजागृती आणि सामाजिक प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात काम करते.ज्यावेळी समाजात असे एखादे मोठे संकट येते त्यावेळी नेहमी लोकांच्या मदतीला ही
संस्था धावून आली आहे.
दोन वर्षांपूर्वी दुष्काळातही
या संस्थेने अक्कलकोटसह लोहारा,तुळजापूर तालुक्यात जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हौद बांधून देण्याबरोबरच अनेक गावात २ हजार लिटरच्या पिण्याच्या पाण्यासाठी टाकी देऊनही गावांची तहान भागविली आहे. सध्या कोरोनाचे संकट देखील गंभीर आहे महिलांच्या हाताला काम नाही अशा परिस्थितीत निराधार महिलांनी जगायचे कसे असा प्रश्न आहे.त्यामुळे लोहारा तालुक्यातील दीडशे, तुळजापूर तालुक्यातील चाळीस आणि अक्कलकोट तालुक्यातील दहा अशा दोनशे विधवा निराधार महिलांना किमान दोन लाख रुपयांचे किराणामाल घेऊन देऊन त्यांना जगण्याचे बळ दिले आहे.ही सामाजिक बांधिलकी आपण गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेच्या माध्यमातून जोपासत आहोत. कोरोनाबद्दल ग्रामीण भागामध्ये जनजागृतीही सुरू असून लोकांनी बाहेर येणे टाळावे आणि स्वतःला सुरक्षित ठेवावे,असे आवाहन डॉ. शशिकांत अहंकारी
यांनी केले आहे. शनिवारी, अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे दहा महिलांना किराणा बाजाराचे वाटप
हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे समन्वयक बसवराज नरे आणि जावेद शेख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रबोध कांबळे,सतीश कदम, दत्ता गायकवाड, विवेक शेकापुरे, बाशा शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.