Home महाराष्ट्र कोरोनाच्या लॉकडावुनमुळे सुतार , लोव्हार , सोनार , मजुर आदी कारागिरांवर आली...

कोरोनाच्या लॉकडावुनमुळे सुतार , लोव्हार , सोनार , मजुर आदी कारागिरांवर आली उपासमारीची वेळ – शिवानंद पांचाळ नायगांवकर

317

नांदेड – ( राजेश भांगे ) – नायगांव, कोरोना व्हायरस आणि संचारबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्या सुतार लोव्हार सोनार अदी कारागिरांचे काम व्यवसाय बंद असल्याने हा वर्ग अडचणीत सापडला आहे.

फर्निचरचे काम व ईतर कारागिरांचे काम कारागिरांचे काम बंद असल्याने सुतार लोव्हार सोनार कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे,
यामध्ये ठेकेदार ग्राहक व्यापारी कामगारांचा दैनंदिन प्रपंच असतो, गेल्या काही दिवसांपासून काम बंद असल्याने व आगामी काही दिसत काम बंद राहणार असल्याने या कारागिरांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, कोरोनामुळे बाहेर काम करता येत नाही आणि संचारबंदी मुळे बाहेरही निघता येत नाही, त्यातच घरातील सर्वकाही जीवनावश्यक साहित्य संपले असुन रोजचे हातावर पोट असल्याने पैसे आणायचे तरी कुठून हा प्रश्न त्यांना सतावत आहे, सुतार लोव्हार सोनार इतर काही क्षेत्रातील कामगार हे असंघटित कामगार आहे, हातावर पोट असलेल्या या कारागिरांवर कोरोना व संचारबंदीमुळे अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे,
सुतार लोव्हार सोनार ईतर कारागिर जवळपास ८० टक्के समाज अजुनही पारंपारिक पद्धतीने आपले व्यवसाय करतो,
आता अद्यावत यंत्रांनी पारंपरिक कामे करणाऱ्यांची जागा घेतल्याने तसेच हा कारागिर वर्ग कोरोना व संचारबंदीमुळे पुर्णपणे खचला आहे, ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील सुतार लोव्हार सोनार अदी कारागिरांची काम करणाऱ्यांची स्थिति यापेक्षाही गंभीर आहे,
सदर समाज स्वाभिमानी असल्याने तो सहसा
कोणा पुढे हात पसरताना दिसत नसल्याने त्यांना या भयानक अडचणी सामोरे जावे लागत आहे. तसेच कारागीरांची कामे करणाऱ्यांची स्थिती यापेक्षाही गंभीर असुन या कारागीर लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने यावेळी निश्चितच धोरणात्मक निर्माण आहे अशी भावना सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी व्यक्त केले.

तसेच यावेळी कोरोना व्हायरच्या विरोधात लढाईत मोलाची भुमिका बजावणाय्रा शासकिय व प्रशासकीय यंत्रणांचे पोलिसवाला आॕनलाईन मिडियाच्या माध्यमातुन आभार मानले.