Home विदर्भ सौंदळा येथील श्री देवी यात्रा महोत्सव रद्द ,

सौंदळा येथील श्री देवी यात्रा महोत्सव रद्द ,

206

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जोपासत संस्थानचा निर्णय

देवानंद खिरकर ,

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील सौंदळा येथील श्री देवी संस्थान द्वारे दरवर्षी आयोजित केला जाणारा यात्रा महोत्सव यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेला आहे.
दरवर्षी चैत्र पाडव्याला आयोजित होणारा श्रीदेवी संस्थांचा भव्य यात्रा महोत्सव संपूर्ण वऱ्हाडात प्रसिद्ध असून दोन ते तीन दिवसीय यात्रा महोत्सवात शेगडी मिरवणूक, देवी मिरवणूक, साधे लोटांगण रिंगणीच्या काटे वरील लोटांगण, गाड्या ओढणे, महाप्रसाद, पोत मिरवणूक, आणि अंगावर शहारे आणणारा नाडे टोचण्याचा कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम यात्रा महोत्सवादरम्यान होत असतात. परंतु यावर्षी संपूर्ण यात्रा महोत्सवच रद्द करण्यात आलेला आहे.
सरकार आणि प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात सर्वत्र धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलेली आहे. शासनाचा आदेशाचा सन्मान राखत आणि अकोला जिल्ह्याला कोरोना मुक्त ठेवण्याचा निर्धार करीत सौंदळा- बादखेड येथील सर्व गावकरी मंडळी आणि मंदिराच्या विश्वस्तांनी यावर्षी यात्रा महोत्सव आणि त्यादरम्यान दरवर्षी आयोजित होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व भाविक भक्तांनी यावर्षी आपापल्या घरीच मातेचे पूजन करावे अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष नवल साहेबराव अरबट यांनी दिली आहे. सामाजिक बांधिलकीतून घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे