July 7, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

धा.बढेच्या धान्य वितरणाच्या माहीती वृत्तसंकलन प्रसंगी पत्रकारास १० हजार मागल्याचा खोटा आरोप करुन पाहुन घेण्याची सरपंचाने दिली धमकी

मोताळा – रहिम शेख

बुलठाणा – धा.बढे येथे शासन मान्य एकुण चार दुकानी असुन मुक्ताई बचत गट,पटेल,पठाण,व हागे यांचे कडे असुन एका दुकानदारा कडे चारशे ते चारशेच्या जवळ पास रेशन लाभधारक आहे.

या लाभार्थ्यात अन्नपुर्णा लाभार्थि यांना मोफत धान्य सेवा तर अंत्योदय लाभार्थि दा.रे.खालील लाभार्थि ए.पि.एल.,बि.पि.एल सह अन्नसुरक्षासह अनेक शिधापत्रिका धारक धान्य उचल घेतात.
कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थितीत व संचारबंदिच्या कठोर धोरणाने सर्व सामान्य जनतेची उपासमारी थांबवण्याचे प्रयत्नात शासनाने पुर्विच्या प्रती व्यक्ती २+३ किलो प्रमाणे २ रुपये किलो गहु व ३ रुपये कि. तांदुळ वितरिक्त प्रति व्यक्ती ५कि.तांदुळ मोफत माहे एप्रिल पासुन सुरु करण्याचे घोषीत केल्याने माहे एप्रिल मधील वितरण प्रसंगी मोफत वितरण न मिळाल्याने अनेक रेशन लाभार्थि पं. समिती पुत्र श्रीकृष्ण भोरे सह काहि पत्रकारांना या बाबत विचारण्यास गेले या बाबतचा खुलासा करण्यास गेले असता हागे , मुक्ताई बचत गट यांचे ,धान्य वाटप सुरु होते व पठाण यांना माल न मिळाल्याने त्यांचे वाटप बंद असल्याचे पठाणा यांनी सांगितले शेवटी पटेल यांचे धान्य दुकानावर गेले असता रहीम शेख , श्रिकृष्ण भोरे व सोबत असलेले वसंत जगताप यांनी काही विचारण्या पुर्विच बाहेरिल हात धुन्याचे सह डिस्टंसिंग बाबत फोटो व सुटींग घेते प्रसंगी धान्याची वाटप सोडुन दुकानातुन बाहेर येत शेख रहीम यास मज्जाव करुन तुझ्याकडे कुणाची तक्रार आहे का विचारत व का घेतो सुटींग व अनेक उपस्थित रेशन धारका समक्ष दि.४ एप्रिलच्या सकाळी १० ते १० : ३० वा. दरम्यान १० हजार रुपये मागणी केल्याचा खोटा आरोप करुन सत्य दाबण्याचा प्रकार करुन तुला पाहुन घेईन अशी धमकी दीली
शासनाने माहे एप्रिल मधील पुर्विच्याच धान्य वितरणासह प्रति व्यक्ती ५ किलो धान्य मोफत मिळणार असल्याचे शहनिशा न करता या प्रकरणात सरपंचाचा पत्रकारांना खोट्या प्रकरणात कसे फसवता येईल हे दिसुन आले
अश्याच प्रकारे पत्रकारांची मुस्कटदाबी करुन हम करे सो कायदा करणा-या सरपंचा विरुध्द स्थानिक पत्रकारांनी दखल घेत धा.बढे पो.स्टे ला तक्रार दाखल केलीअसुन मोताळा तहसिलदार यांना ही या बाबत तक्रार प्राप्त केली आहे तर पुढील तक्रारी वरिष्ठांकडे कोरोना परिस्थितीच्या संचारबंदीमुळे स्थगित ठेवत पत्रकार संघटने कडे ही या बाबत प्रकरण पाठवणार असल्याचे रहीम शेख यांनी सांगितले.

विषेश , शासनाचे निर्धारित दरा वितिरीक्त जादा दरा सह विना पावती व कमी धान्य देण्याच्याही तक्रारी शिधापत्रिका धारका कडुन ऐकावयास मिळाल्या तर साखरेचे वाटप अनेक महीन्या पासुन बंद असल्याने शासनाने स्वस्त धान्य दुकानातुन साखर उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी सर्व लाभधारकातुन होत आहे.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!