Home विदर्भ चंद्रपुर नागपूर मार्गावर कारच्या अपघातात अभियंता ठार तर अन्य एक गंभीर जखमी

चंद्रपुर नागपूर मार्गावर कारच्या अपघातात अभियंता ठार तर अन्य एक गंभीर जखमी

197

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – चंद्रपुर नागपूर मार्गावर कार चालकाचे कार वरून नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन झालेल्या या अपाघातात एक ठार एक जण गंभीर जखमी झाला.

हा अपघात शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव जगन्नाथ डंभारे वय ५६ वर्ष राहणार अब्दुला नगर हिंगणघाट असे आहे.तर जखमीचे नाव ज्ञानेश्वर पांडुरंग हेडाऊ वय ५२ राहणार संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट असे आहे.जगन्नाथ डंभारे हे चंद्रपुर येथिल महाराष्ट्र जिवन प्रधिकरण येथे अभियंता म्हणून कार्यरत होते. तर ज्ञानेश्वर हेडाऊ हे वरोरा येथे पाणीपुरवठा विभाग काम करीत होते. दोद्येही कार्यालयीन काम संपवून आपल्या गावाकडे कारने परत येत असताना चंद्रपुर नागपूर मार्गावरील नंदोरी जवळ कार चालक जगनाथ डंभारे यांचे कार वरूून नियंत्रण सुटल्याने कार अनियंत्रित होऊन कार पलडी झाली.यावेळी जगन्नाथ डंभारे याचा कार मधून पडून जागीच मृत्यू झाला तर ज्ञानेश्वर हेडाऊ हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिसांनी घटनास्थ गाठून जखमीला प्राथमिक उपचारासाठी समुद्रपुर येथिल ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा पुढिल तपास समुद्रपुर पोलिस करीत आहे.