Home विदर्भ ग्रामपंचायत बहिरखेड (उमरदरी) येथे कोरानाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरपंच कविता किरण ठाकरे यांनी...

ग्रामपंचायत बहिरखेड (उमरदरी) येथे कोरानाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरपंच कविता किरण ठाकरे यांनी जंतुनाशक फवारणी केली.

172

नागरिकांना घरात राहण्याच्या व घराच्या बाहेर न पडण्याचे आवाहन

प्रतिनिधी पवन जाधव

बहिरखेड (उमरदरी) ग्रामपंचायतीने संपूर्ण गावांमध्ये येणारे रस्ते, गल्ल्या आणि गावाला लागून जाणारे काही मार्ग या सर्वांवर विविध औषधांची फवारणी करत आहेत. ही औषध फवारणी चालू आहे, ती कोरोनासोबतच इतर कोणतीही रोगराई गावात फिरकू नये या काळजी पोटी. बहिरखेड उमदरी या गावातील अनेक तरुण नोकरी निमित्ताने तसेच काही शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर पसरलेले आहेत. मात्र गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण जगभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे बाहेर असणारे सर्व नागरिक आता आपल्या गावाला येऊ लागलेले आहेत. या नागरिकांमधून कोरोनाची लागण झालेले नागरिकही गावात प्रवेश करु शकतात आणि त्यांच्यामुळे गावातील इतर नागरिकांना त्याची लागण होऊ शकते. त्यामुळे स्मार्ट बहिरखेड उमरदरी ग्रामपंचायतीने संपूर्ण गावभर विविध औषधांची फवारणी केली जात असून सरपंच कवीता कीरण ठाकरे उपसरपंच दिपीका गनेश ईगोले सदस्य उदय ठाकरे सरपंच पती किरण पाटिल गणेश ईगोले जितू आडे ताराबाई घूमसे रेखाबाई ठाकरे ग्रामसेवीका जया मानिकराव तलाठी मनिष हळदे विष्नू घूमसे अतूल ठाकरे प्रदिप घूमसे स्वपनिल पाटिल अनंता घूमसे यांनी गावात फवारणी केले