Home जळगाव जळगाववरुन हैद्राबाद ७२३ किमी अंतर कापण्यासाठी पायी चालत निघालेले कामगार ६० किमी...

जळगाववरुन हैद्राबाद ७२३ किमी अंतर कापण्यासाठी पायी चालत निघालेले कामगार ६० किमी अंतर चालून आले.

236

बोदवडात मदतीसाठी तरुण सरसावले

रावेर – शरीफ शेख

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर जिल्हा लॉकडाऊन झाल्यामूळे हातावर पोट असणार्यांची ऊपासमारी होत आहे. लॉकडाऊनमूळे सर्वच ऊद्योगधंद्यांना टाळे ठोकल्या गेले. परिणामी ; कामधंद्यासाठी परराज्यातून आलेल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हालाचे बेहाल होत आहेत. त्यामूळे रोज मजूरी करुन पोट भरणार्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली. या पार्श्वभूमिवर अनेकांनी आपआपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला. अशातच, हैद्राबादहून जळगाव येथे खाजगी कंपनित कामासाठी १० ते १२ कामगार आलेले होते. लॉकडाऊनमूळे त्यांनी मूळगावी परतण्याचा निर्णय घेतला. राज्यातील वाहतूक बंद असल्यामूळे ते जळगाव ते हैद्राबाद असे ७२३ किमी अंतर पायी चालत जाण्यासाठी निघाले. पूढे, ६० किमी अंतर चालत आल्यावर त्यांनी बोदवड येथील मलकापूर रसत्यावरील खंडेलवाल पंपाजवळ रात्री १०:३० च्या सूमारास गर्दी करत विश्रांती साठी थांबले. त्यात मलकापूरकडे जाणार्या वाहनांना हात दिला असता कोणाही थांबत नव्हते
यांत २० ते २५ वयाचे तरुण सर्वाधिक होते तर एका व्यक्तीच्या पायाचे ऑपरेशन नुकतेच झाले होते त्याला चालणेही मूश्कील झाले होते. सदरील प्रकार बोदवड शहरातील तरुणांना दिसला असता त्यांनी सदरील प्रकाराची विचारपूस केली असता गावाकडे निघालेल्या कामगारांना अश्रू अनावर झाले. सर्वच भूकेने व्याकूळ झाले असतांना ऊपस्थित तरुणांनी त्यांना काही खाद्यपदार्थ आणून दिले व मलकापूर कडे जाण्यासाठी स्वखर्चाने वाहन करुन दिले व सोबत खाद्यपदार्थाचिही व्यवस्था करुन दिली. घरी पोहोचल्यावर फोन लावा असे बोलत तरुणांनी त्यांना दिलासा दिला.
समीर पिंजारी, जफर शेख, समीर शेख,आसिफ अलाउद्दीन शेख, कलीम शेख , आदिल खान, जाबिर शेख, पप्पू यांच्यासहित यूवक वर्ग ऊपस्थित होता. ह्या संकटात जे कोणी रसत्यावर दिसतील त्यांना ‘माणूसकी धर्म’ जोपासून सढळ हातांनी मदत करण्याचे आवाहन यावेळेस सर्व यूवकांनी केले.