Home महत्वाची बातमी संचारबंदी काळात पञकारांना मारहाण करणाऱ्या वर कारवाई करा

संचारबंदी काळात पञकारांना मारहाण करणाऱ्या वर कारवाई करा

163

(प्रतिनिधी लियाकत शाह)

महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनेचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन मोताळा कोरोनामुळे राज्यात संचारबंदी असताना पोलिसांकडून सर्वसामान्यांना मारहाण होत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत, मात्र संचारबंदी च्या काळात आपला जिव धोक्यात घालुन जनतेला योग्य माहिती देण्याचे काम करणाऱ्या लोकशाही चा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारानाच पोलिसांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात हिंगोलीतील आयबीएन लोकमतचे पत्रकार कन्हैय्या खंडेलवाल, औरंगाबाद येथील मनोज जाधव यांचेसह टिटवाळा (जि.ठाणे) येथील पत्रकार राजू टपाल, बारामती येथील गोकूळ टांकसाळ, भद्रावती (जि.चंद्रपूर) येथील दैनिक भूमिपूत्रचे पत्रकार उमेश कांबळे, तर लातुर येथिल पञकार नृसिंह घोणेे, बिड येथील पत्रकार मुधोळ कर यांच्यावर तर गुन्हा दाखल करण्यात आला तरी, पोलीस प्रशासनांनी कायदा हातात घेवु नये व पत्रकारांना मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्या वर कडक कारवाई करण्या संबंधीचे निवेदन महाराष्ट्र लढा पत्रकार संघटना च्या वतीने बोराखेडी पोलीस निरीक्षक माधवराव गरूड यांच्या मार्फत बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, आपण पत्रकार असल्याचं हे सर्वच पोलिसांना सांगत असताना ही तसेच सोबतचं संबंधित वृत्तपत्राचे आयकार्ड दाखवून देखील पोलिसांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. मारहाण झाल्यानंतर संबंधीत पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदीचे आदेश आहेत, मात्र पत्रकार अत्यावश्यक सेवांमध्ये येत असल्याने त्यांना वार्तांकनासाठी फिरण्याची मुभा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तसे आदेश आहेत मात्र काही पोलिसांनी दादागिरी करत या आदेशाचं उल्लंघन केलं आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करुन त्यांना निलंबीत करावे अशी मागणी महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष लुकमान शाह यांनी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन द्वारे केली आहे.