Home मराठवाडा देगलूर येथे आढवडी बाजार भरवुन कलम १४४ ला दाखविले केराची टोपली

देगलूर येथे आढवडी बाजार भरवुन कलम १४४ ला दाखविले केराची टोपली

148

नांदेड, दि.२९ – ( राजेश भांगे ) – जगभरात व देशात कोविड १९ नोबेल कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला असुन. दि.२३ मार्च पासुन राज्यात मा मुख्यमंत्र्यांनी लाॕकडावुनची भुमिका घेत संपुर्ण राज्य व जिल्ह्यांच्या सिमा बंद करण्याचे तसेच राज्या सह सर्वच जिल्ह्यात , तालूक्यात व ग्रामिण भागात जमाव बंदि चे कलम १४४ लागु केले असुन अत्ता पर्यंत सगळे सुराळीत चालले असतानाच मात्र अचानक पणे आज दि. २८ मार्च रोजी देगलूर शहरात शनिवार चा आढवडि बाजार भरल्याने ( प्रशासनाने सामाजिक अंतर ठेवुन भाजी विक्री करण्यासाठी मार्क केले होते पण ) सर्व सामान्य येड्या गबाळ्या जनतेने शेकडोंच्या संख्येने भाजी पाला घेण्यासाठी एकच गर्दि केल्याने कोरोना व्हायरचा फैलाव होवुन हजारो निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाहि. तरी यावेळी याची दखल शहरातील कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांने न घेतल्याने सुशिक्षित नागरिकांन मधुन आश्चर्य व्यक्त केले जात होते. तरी महाराष्ट्र राज्याचे मा, मुख्यमंत्री व नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या च काढलेल्या जमाव बंदि च्या कलम १४४ च्या आदेशाला जणू केराची टोपलीच दाखविल्याचे चित्र आजच्या या परिस्थिती कडे पाहताना दिसुन आल्याने स्थानिक प्रशासना बद्दल नागरिकांन मध्ये उलटृ सुलट चर्चेला उधान आल्याचे दिसुन आले.