Home जळगाव मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला महिन्याचा पगार

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला महिन्याचा पगार

188

प्रतिनिधी – लियाकत शाह

जळगाव: कोरोनाच्या भयंकर महामारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आटोकाट प्रयत्न सुरू असून महाराष्ट्र शासन जीवाचे रान करीत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे मुक्ताईनगर तालुकावासीयांचे स्वागत केले आहे. आमदार पाटलांनी उभा केला आदर्श आमदार पाटील हे कोरोना संदर्भात कमालीचे दक्ष असून त्यांनी आरोग्य विभागाची सर्वात आधी आढावा बैठक घेत मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना विषाणू कोविड- १९ विलगीकरण तपासणी कक्षाची स्थापना केली. आजपर्यंत बाहेर गावाहून विलगीकरण कक्षात सुमारे एक हजार २५० लोकांनी कोरोना तपासणी केली आहे तसेच आमदार पाटील यांनी मतदार संघात ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करीत असून मतदारसंघातील ग्रामपंचायत तसेच नगरपालिका यांना सुचना देत निर्जंतुकीकरण फवारणी करून घेत आहेत. यात आणखी एक महत्वाची घोषणा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली असून त्यांनी आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.